घरताज्या घडामोडीमुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंह यांची उचलबांगडी, नगराळे नवे आयुक्त

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंह यांची उचलबांगडी, नगराळे नवे आयुक्त

Subscribe

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राच्या आयपीएस लॉबीतील सर्वात मोठी खांदेपालट आज बुधवारी ट्विटरच्या अकाऊंटवरून जाहीर केली. ठाकरे सरकारमध्ये आयपीएस अधिकाऱ्यांमधील ही सर्वात मोठी बदल्यांची घोषणा आहे. मुंबई पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची बदली झाली आहे. हेमंत नगराळे यांच्याकडे सध्या राज्याच्या महासंचालक पदाची प्रभारी म्हणून जबाबदारी होती. तर रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मुंबई पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी करत परबमीर सिंह यांना गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर संजय पांडे या सर्वात जेष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे.

काय आहे गृहमंत्र्यांचे ट्विट

- Advertisement -

मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एकाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा. अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

- Advertisement -


परमबीर सिंह यांची जी भूमिका सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेण्याबाबत होती तसेच राज्यात मागील ६ महिन्यांपासून वाझे गँगने जो हाहाकार माजवला आहे तो मुंबई पोलीसांच्या आयुक्तांच्या बदलीने थांबणार नाही आहे. असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. परंतु परमबीर सिंह यांची आणि आणखी एक आयपीएस अधिकाऱ्याची चौकशी व्हायला हवी यासंदर्भात मागणी करण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. परमबीर सिहं यांच्या बदलीने हे प्रकरण दबून जाईल असे मुख्यमंत्र्यांना वाटत असेल परंतु आम्ही असे होऊ देणार नाही अंतिम खुलासा होईपर्यंत पाठपुरावा करु असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

सचिन वाझे प्रकरणात पहिल्या दिवसापासून आमची मागणी होती की वाझे ज्यांच्या हाताखाली काम करत होते त्यांच्यावर कारवाई करावी कारण हे प्रकरण त्यांच्यापर्यंत जाणार होते याची आम्हाला खात्री होती. पहिल्यादिवसापासून आमची मागणी होती. की ज्याच्या हाताखाली वाझे काम करतात त्याच्यावर कारवाई होणार यावर आमची खात्री होती.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -