शीख समुदायाच्या तक्रारीची दखल,अभिनेत्री कंगना रणौत विरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

गृहमंत्र्यांनी दिल्ली शीख गुरुद्वार मॅनेजमेंट कमिटीचे म्हणणे ऐकून घेतले व कंगनाविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे

home minister dilip walse patil assured delhi sikh gurdwara management committee to take action against kangana ranaut
शीख समुदायाच्या तक्रारीची दखल, कंगनाविरोधात कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन

अभिनेत्री कंगना रणौतने शेतकऱ्यांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दिल्ली शीख गुरुद्वार मॅनेजमेंट कमिटीने सोमवारी कंगनाविरोधात मुंबईत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत कंगना विरोधात खार पोलीस ठाण्यात
भादवि कलम 295 ( A ) अंतर्गत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.  मुलुंड मध्ये राहणाऱ्या एका ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीख धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यासंदर्भात आज मंगळवारी दिल्ली शीख गुरुद्वार मॅनेजमेंट कमिटीने महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली असून कंगना विरोधात गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी गृहमंत्र्यांनी दिल्ली शीख गुरुद्वार मॅनेजमेंट कमिटीचे म्हणणे ऐकून घेतले व कंगनाविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देिले होतेय.  गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर दिल्ली शीख गुरुद्वार मॅनेजमेंट कमिटी अध्यक्ष आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांची गृहमंत्र्यासोबत भेट झाल्याची माहिती दिली.

मनजिंदर सिंह सिरसा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये त्यांनी म्हटले आहे की, आमची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत भेट झाली. कंगना रणौत देशात जे विश पेरत आहे त्यासंदर्भात गृहमंत्र्यांशी बोलणे झाले. कंगनाविरोधात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. मुंबई पोलीस कंगना विरोधात नक्की गुन्हा दाखल करतील असा आम्हाला विश्वास असून लवकरात लवकर कंगना जेलमध्ये असेल, असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्राने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी कंगनाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यात शीख धर्मियांवर आक्षेपार्य टिप्पणी केली होती ज्यात तिने शीख धर्मियांना खलिस्तानी आतंकवादी म्हटले होते. कंगनाच्या या पोस्टनंतर शीख धर्मियांनी मुंबईत खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.


हेही वाचा – Mission Punjab : केजरीवाल यांचा डिनर विथ ऑटो ड्रायव्हर, अन् राईडही