Sakinaka Rape Murder Case : मुंबई पोलिसांचे गृहमंत्री वळसे पाटलांकडून कौतुक

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की,  साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत सरकारतर्फे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.

मुंबईतील साकीनाका येथे ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या (Sakinaka Rape Murder Case) करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी मोहन चौहान (Mohan Chauhan) याला दिंडोशी न्यायालयाने गुरूवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. या घटनेने देशभरात संताप व्यक्त केला जात होता. मुंबई पोलिसांनी (mumbai police) घटनेच्या १८ दिवसांत तपास पूर्ण करुन आपला अहवाल तयार केला होता. न्यायालयाच्या या निर्णयानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे.

पोलिसांनी चोखपणे कर्तव्य बजावले

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की,  साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत सरकारतर्फे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. साकीनाका घटनेतील मुंबई पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ हा १० मिनिटे इतका जलद होता. या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी अत्यंत जलदगतीने पूर्ण केला. संबंधित आरोपीविरोधात सर्व पुरावे जमा करून पोलिसांनी अवघ्या १८ दिवसांत दिंडोशी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. पोलिसांनी चोखपणे आपले कर्तव्य बजावत हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली.  त्यामुळे न्याय प्रक्रियेला गती मिळाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दाखवलेल्या कार्यतत्परतेबाबत आपण समाधानी आहोत. महिला सुरक्षितता आणि महिलांच्या सन्मानाविषयी महाराष्ट्र पोलीस अत्यंत जागरूक असल्याचा संदेश याद्वारे समाजात पोहोचावा, अशी अपेक्षा आहे.

 नेमकं प्रकरण काय?

साकीनाका परिसरात २०२१ मध्ये ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. बलात्कार करणारा आरोपी आणि पीडित महिला एकमेकांच्या परिचयाचे होते. आरोपीने महिलेला एका टेम्पोमध्ये मारहाण केली. एका सुरक्षा रक्षकाने हा प्रकार पाहून पोलिसांना माहिती दिली होती. पोलीस अवघ्या १० मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टेम्पोत पाहिले असता महिला जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. क्षणाचाही विलंब न करता महिला पोलिसांनी त्याच टेम्पोतून महिलेला रुग्णालयात दाखल केले होते. पीडित महिलेच्या गुप्त भागातून रक्तस्त्राव होत होता. राजावाडी रुग्णालयात महिलेवर उपचार कऱण्यात येत होते. तिच्या गुप्त भागावर रक्तस्त्राव होत असल्याने रात्री उशिरा तिच्यावर ऑपरेशन करण्यात आले होते. मात्र ती महिला बेशुद्धावस्थेत होती. प्रकृती गंभीर असल्याने तिला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.