घरमुंबईमनसुखच्या अंगावर कोणतंही दुखापतीचे मार्क नाही, गृहमंत्र्यांचा खुलासा

मनसुखच्या अंगावर कोणतंही दुखापतीचे मार्क नाही, गृहमंत्र्यांचा खुलासा

Subscribe

तात्काळ प्रकरण एनआयकडे द्यावे - फडणवीस

प्रख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर अवैध स्फोटकांची स्कॉर्पिओ गाडी सापडली त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूने राज्यात चर्चांणा उधाण आले आहे. विधानसभेत विरोधकांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूमुळे सरकारला धारेवर धरले आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत सापडला आहे. त्यांच्या शरीरावर कोणतीही दुखापत नव्हती. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण समोर येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितले आहे. ठाणे नितीन अनंत कुरे हे या प्रकरणी तपास करत आहेत. असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

तात्काळ प्रकरण एनआयकडे द्यावे – फडणवीस

मनसुख हिरेन यांनी दिलेल्या जबाबात म्हटलं आहे की, स्कॉर्पिओ गाडी घरगुती वापरासाठी घेतली होती. परंतु त्या गाडीचे स्टेअरिंग जॅम झाले होते. त्यासाठी क्रॉफर्ड मार्केटला जाऊन भेटले? कोणाला भेटले? सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्यात संवाद आहे. मनसुख हिरेन हे मुख्य दुवा होते त्यांचाय आता मृतदेह सापडला आहे. त्यांचे हातही मागे बांधलेले आहेत. हात बांधून कोण आत्महत्या करत नाही. हे प्रकरणा तात्काळ एनआयएकडे देण्यात यावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

- Advertisement -

गृहमंत्र्यांच्या उत्तरात विसंगती

मनसुख प्रकरणावर गृहमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात विसंगती आहेत. गृहमंत्र्यांच्या हेतूवर शंका नाही. स्फोटक प्रकरणातील मुख्य साक्षीदार किंवा आरोपी, प्रत्यक्षदर्शी असेल तर त्याला संरक्षण का दिलं नाही. आरोपी असेल तर त्याला मोकळं का सोडले, या प्रकरणात काहीतरी काळंबेर आहे. निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे तसेच या प्रकरणाचा तपास एनआएकडे दिला पाहिजे अशी मागणी आशिष शेलार यांनी दिली आहे.

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

अंबानी स्फोटकं प्रकरणातील मुख्य दुवा असलेले मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही घटना गंभीर असून पुन्हा एकदा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा तपास तात्काळ एनआयएकडे देण्यात यावा अशी मागणी भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक गाडी सापडली. हा घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. वाहन सापडल्यावर टेलीग्रामवर एक ग्रुप तयार झाला आणि त्यावर एक पत्र आले, ‘जैश उल हिंद‘ नावाने. एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिलं होतं. पण तसं कुठलं खातंच नव्हतं. या ठिकाणी एक नाही तर दोन गाड्या. गाडी ओळखल्याबरोबर सचिन वाझे पहिल्यांदा पोहोचले. तीन दिवसांपूर्वी सचिन वाझे यांना काढले. ज्यांची गाडी चोरीला गेली, त्याच्याशी एका क्रमांकावर अनेक वेळा संवाद झाले. वाझे ठाण्यातील, गाड्या ठाण्यातील आणि या दोघांचे आधीपासून संवाद होता. शंकेला वाव देणारे बरेच पुरावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी NIA ला द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली.

जैश उल हिंद या अतिरेकी संघटनेने या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी झटकल्याने एकूणच संशय बळावला होता. आता तर स्कॉर्पियोचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह मुंब्रा रेती बंगदर येथे सापडल्याने हे सरर्व प्रकरण आता गंभीर वळणावर पोहचले आहे. गेल्याच आठवड्यात हिरेन यांनी स्वतः पोलिसांसमोर हजर राहत आपली गाडी हरवली असल्याची तक्रार पोलीस स्थानकात केली होती. दरम्यान शुक्रवारी दुपारी हीरेन यांच्या कुटूंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार नौपाडा पोलीस स्थानकात नोंदवली होती. मात्र काही तासांअगोदरच मनसुख हिरेन याचा मृतदेह रेती बंदर येथील खाडीत सापडला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -