घरमुंबईमुंबई ब्लॅकआऊट प्रकरणी चौकशी अहवाल सादर, चीनने सायबर हल्ला केल्याचा संशय

मुंबई ब्लॅकआऊट प्रकरणी चौकशी अहवाल सादर, चीनने सायबर हल्ला केल्याचा संशय

Subscribe

मुंबईच्या इलेक्ट्रीक इंन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मालवेअर टाकण्याचा प्रयत्न

मुंबईत १२ ऑक्टोबर २०२० मध्ये वीज पावर कट झाली होती. याच्या एमएससीबीने चौकशी केली याची सखोल चौकशी व्हावी यासाठी महाराष्ट्र सायबर सेलद्वारे चौकशी करण्याची मागणी केली होती. यावर महाराष्ट्र सायबरने चौकशी केली आहे. न्युयॉर्क टाईम्समध्ये बातमी आली आहे. त्यामध्ये काल रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क अॅनालिसीस कंपनी यांनी सुद्धा आपला रिपोर्ट जाहीर केला आहे. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी चीनने सायबर हल्ला केल्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईत झालेल्या मुंबईच्या इलेक्ट्रीक इंन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मालवेअर टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. अशा पद्धतीचा अहवाल त्यांनी दिला आहे.

तसेच आजच्या न्युयॉर्क टाईम्समध्ये आणि वॉलस्ट्रिट जर्नलमध्येही सांगण्यात आले आहे. मुंबईत झालेल्या इलेक्ट्रिक फेल्युरवर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत चर्चा झाली. यामध्ये काही छेडछाड झाल्याची शक्यता राऊत यांनी वर्तवली होती. त्यामुळे याचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र सायबरला दिले होते. महाराष्ट्र सायबरने याच्यामध्ये सुपरवायझरी कंट्रोल डाटा एक्विशन सिस्टम त्याच्या बाबतीत त्यांनी अॅनालिसीसी केले यामध्ये त्यांनी सायबर साबोटेज असू शकतो अशी शक्यता असल्याचे महाराष्ट्र सायबरने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र सायबर सेलने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, १४ ट्रोजन हॉर्सेस या सर्विसमध्ये टाकण्याचा पुरावा मिळाला आहे. ८ जीबी डाटा हा फॉरेन अनकॉनटेड डाटा एमएससीबीच्या सर्व्हरमध्ये ट्रान्सफर झालेला असू शकतो. ब्लॅक लिस्टेड आयपीचा वापर करुन सर्व्हरमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न झाला असू शकतो. असे गृहमंत्री अनील देशमुख यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले नितीन राऊत

मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडीत झाला होता. मुंबई संपूर्णपणे अंधारात गेली होती. कळवा पडघे सर्किट ४००केवी या लाईनवर कंडक्टर तुटून ब्रेकडाऊन झाले त्याचवेळी खारघर येथील ४०० केवी लाईनवर लोड येऊन मुंबईचे आयलॅंडिंग कोसळले होते. त्यामुळे संपूर्ण मुंबईचे कामकाज ठप्प पडले होते. ही घटना अत्यंत महत्त्वपूर्ण होती. राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली होती. याबाबत स्वतंत्रपणे चौकशीची कारवाई केली होती. यामध्ये घातपाताचा संशय मी व्यक्त केला होता. याबबत गृहमंत्र्यांना विनंती करुन चौकशी करण्यास सांगितले होते असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -