घरमनोरंजनमुंबै महोत्सवात कलाकारांचा होणार सन्मान!

मुंबै महोत्सवात कलाकारांचा होणार सन्मान!

Subscribe

पूर्वी ‘बॉम्बे’, नंतर ‘मुंबई’ आणि आता ‘आमची मुंबई’ अशी मुंबईची ओळख आहे. आता आपुलकीने ‘मुंबै’ ही बोलले जाते. या मुंबईला माणसात, समाजात, धर्मात विभागणी करणे माहीत नाही. इथे जो आला, ज्याने कष्ट करण्याची तयारी दाखवली तो हमखास इथे यशस्वी झालेला आहे अशीही मुंबईची ख्याती. गरीब-श्रीमंत, मराठी-अमराठी, साहित्य, कला, क्रीडाप्रेमींची ही नगरी. जगभरात जन्म कुठेही झाला असला तरी मुंबई ही आमची कर्मभूमी आहे हे सांगताना प्रत्येकाला अभिमान वाटतो. त्यामुळे मुंबई भारतीय नागरिकांचीच नाही तर जगभरातल्या नागरिकांची मोहमाया स्थळ झालेली आहे. अशा मुंबईचा ‘मुंबै’ नावाचा पुरस्कार आपल्या वाट्याला आला तर तो केव्हाही प्रतिष्ठा वाढवणारा असणार आहे. जीवनाधारा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश खाडे गेली दोन वर्षे ‘मुंबै पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करत आहेत. यंदा या महोत्सवाचे तीसरे वर्ष आहे.
चित्रपट, नाटक क्षेत्रात अमूल्य कार्य करणार्‍या अभिनेते अरूण नलावडे, विजय कदम, अभिनेत्री नीशा परूळेकर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. शिवाय विविध क्षेत्रा योगदान देणार्‍या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानीत केले जाणार आहे. यंदा केईएम् रूग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांना ‘मुंबई भूषण’ तर विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) महाराष्ट्र, कृष्णप्रकाश यांना ‘जीवनाधार जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. याशिवाय नंदेश उमप, डॉ. शैलेश नाडकर्णी, शरद उपाध्ये, अभय देशपांडे, मंदार फणसे, राहुल शेवाळे, मंगेश कुडाळकर, राजू पटेल, सुनील राणे, शरदचंद्र पाध्ये, कल्पना सरोज, विनोद शुक्ला, साईकुमार पातरूदु एम्, संतोष कांबळी, नितीन नांदगांवकर, जितेंद्र जानवळे, विलास रूपवते यांनाही ‘मुंबै पुरस्कारा’ ने सन्मानीत करण्यात येणार आहे.
नवीन वर्षाच्या सुरवातीला या तीन दिवसांच्या महोत्सवाला प्रारंभ होईल. १ जानेवारी प्रबोधनकार ठाकरे बोरिवली, २ जाने. दामोदर हॉल परळ, ३ जाने. यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे रोज संध्याकाळी सात वाजता या महोत्सवाला सुरवात होईल. तिन्ही ठिकाणी सायली परब निर्मित ‘श्री महाराष्ट्र देशा’ हा संगीत, नृत्यमय अविष्काराचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. मुंबईकरांना या महोत्सवाचा आनंद विनामूल्य घेता येईल. खासदार व माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, खासदार गोपाळ शेट्टी, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, माजी नगरपाल किरण शांताराम, माजी मंत्री सुरेश खाडे, बबनराव घोलप, लिड कॉमचे अध्यक्ष अशोक विजयकर, आमदार अजय चौधरी, आमदार यामिनी जाधव यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -