घरताज्या घडामोडीचीनमध्ये रूग्णालयाची इमारत कोसळली

चीनमध्ये रूग्णालयाची इमारत कोसळली

Subscribe

चीनमध्ये शनिवारी रात्रीच्या वेळी रूग्णालय कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत जवळपास ७० हून अधिक नागरिक इमारतीच्या मलब्यात अडकल्याचे सांगितले जात आहे.

चीनमध्ये करोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी एका हॉटेलचे रूपांतर रूग्णालयामध्ये केले होते. परंतु शनिवारी रात्रीच्या वेळी रूग्णालयाची इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत जवळपास ७० हून अधिक नागरिक इमारतीच्या मलब्यात अडकल्याचे सांगितले जात आहे. तसेच चीन प्रशासनाकडून मलब्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत २३ जणांना बाहेर काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या रूग्णालयामध्ये करोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू होते.

जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले असून यामध्ये चीन देश हा सर्वाधिक जास्त करोना रूग्ण असलेला देश आहे. त्यामुळे चीनमध्ये रूग्णालये अपुरी पडू लागल्याने एका हॉटेलला रूग्णालय करून तिथे करोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू होते. मात्र, हे रूग्णालय कोसळल्यामुळे भीतीचे सावट पसरले आहे. आतापर्यंत चीन प्रशासनाला इमारतीच्या मलब्यातून ३५ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून इतर नागरिकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -