घरमुंबईतीन सहायक आयुक्तांच्या खांद्यावर रुग्णालयांचा भार

तीन सहायक आयुक्तांच्या खांद्यावर रुग्णालयांचा भार

Subscribe

चार प्रमुख रुग्णालयांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक

मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांना प्रशासकीय कामांसाठी जुंपले जात असल्यामुळे वैद्यकीय सेवेकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे रुग्णलयातील सर्व प्रशासकीय कामे करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)म्हणून नेमण्याची प्रक्रीया सुरु असतानाच महापालिकेने ही जबाबदारी रुग्णलयांच्या परिसरातील सहायक आयुक्तांच्या खांद्यावर टाकली आहे. किरण दिघावकर, प्रशांत सपकाळे आणि देवीदास क्षिरसागर यांची केईएम,शीव, नायर आणि कुपर रुग्णालयांच्या ‘सीईओ’पदी नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या केईए,शीव, नायर आणि कुपर या चारही प्रमुख रुग्णालयांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सहायक आयुक्तांची नेमणूक करून दुहेरी पदभार सोपवला आहे. महापालिकेचे तत्कालिन आयुक्त अजोय मेहता आणि आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी काही महिन्यांपूर्वी केईएम रुग्णालयाची संयुक्त पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान अमेय घोले यांनी रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांवरील प्रशासकीय कामकाजाचा भार कमी करून खासगी रुग्णालयांप्रमाणे सीईओची नेमणूक करण्याची सूचना केली होती . त्यानुसार महापालिकेने खासगी कार्पोरेट क्षेत्रातून ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या प्रक्रीयेला विलंब होणार असल्याने तोपर्यंत सहायक आयुक्तांवर दुहेरी कामकाजाचा भार सोपवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मागील महापालिका सभागृहामध्ये अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी माहिती दिल्यानंतर, सभागृहनेत्या विशाखा राउुत यांच्यासह विरोधी पक्षांनी याला तीव्र विरोध केला होता. परंतु रुग्णालयाच्या हद्दीतील सहायक आयुक्तांना तात्पुरत्या स्वरुपात ही जबाबदारी सोपवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -