घरCORONA UPDATEवरळीतील कोरोना कशा पद्धतीने नियंत्रणात आला? काय होता 'वरळी पॅटर्न'?

वरळीतील कोरोना कशा पद्धतीने नियंत्रणात आला? काय होता ‘वरळी पॅटर्न’?

Subscribe

वरळी पॅर्टन पुढे का चर्चिला गेला?

मुंबईतील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईतील अनेक उच्चभ्रू लोकांची वस्ती असेले परिसर सील करण्यात आले आहेत. तिथल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉट्स पॉट झालेले मुंबईतील काही भाग कधीच विसरणे शक्य नाही. मुंबईतील धारावी आणि त्यानंतर वरळी परिसर कोरोनाचा मुख्य हॉट्सपॉट ठरले होते. मात्र हाच हॉट्सपॉट ठरलेल्या धारावी आणि वरळी पॅटर्न मात्र देशभरात गाजला. जागतिक आरोग्य संघटनेनीही या पॅर्टनचे कौतुक केले. मात्र आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वरळी पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून एकट्या वरळी कोळीवाडा परिसरात १९७ हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. वरळी पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात जाते की काय अशी भिती सर्वांच्या मनात आहे. मुंबईतील मुख्य हॉट्सपॉट ठरलेली वरळी नक्की कोरोनाच्या विळख्यातून कशी बाहेर आली. वरळी पॅर्टन पुढे का चर्चिला गेला? वरळीत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या?

वरळी म्हणजेच मुंबई जी दक्षिण विभाग हा पर्यावरण आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी वरळीत अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मुंबई जी दक्षिण विभागातील वरळी कोळीवाडा आणि जिजामाता नगर या परिसरात कोरोनाचे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होत होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वरळीत पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याचे चित्र समोर येत आहे. यावेळीही वरळीत वरळी पॅटर्न पुन्हा वापरावा लागेल का असा प्रश्न सर्व वरळीकर आणि मुंबईकारांना पडला आहे.

- Advertisement -

काय होता ‘वरळी पॅटर्न’? 

२० एप्रिल २०२० रोजी वरळीत पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर लगेचच १ एप्रिल २०२० रोजी वरळी कोळीवाडा परिसर सील करण्यात आला. रुग्णांना शोधणे, घरगुती किंवा गावठी उपाय करण्यापासून रोखणे, बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधणे त्यांना क्वारंटाईन करणे, त्याचप्रमाणे संसर्ग वाढू नये यासाठी त्यांनी जीवनाश्यक वस्तू पोहचवणे ही सर्व कामे पालिकेने केली आणि यातूनच वरळी पॅटर्न उभा राहिला. वरळी कोळावाडा हा परिसर प्रामुख्याने दाटीवाटीची वस्ती असलेला परिसर आहे त्यामुळे तिथे दिवसाला रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती.

वरळीत केल्या होत्या ‘या’ उपाययोजना

  • वरळीत सुरुवातीलाच ९-१० रुग्ण सापडल्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. परिसरात बाहेर जाण्यास आणि आत येण्यास सक्त मनाई करण्यात आली होती.
  • सकाळी २-३ तास केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.
  • संपूर्ण वरळी परिसरात सातत्याने पालिकेकडून स्पीकरद्वारे कोरोनाचे नियम, घ्यायची काळजी, याविषयी सूचना देण्यात येत होत्या.
  • वरळीत अनेक ठिकाणी आरोग्य कॅम्प आयोजित करण्यात आले होते.
  • वरळी कोळावाडा परिसरात प्रत्येकाच्या घरी जाऊन ऑक्सिजन लेव्हल आणि तापमानची तपासणी केली जात होती.
  • ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यावर जास्त भर देण्यात आला.
  • वरळीतील कोणत्याही चाळीत किंवा इमारतीत कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यास चाळ, इमारत सील करुन आधी त्या ठिकाणी सॅनिटायझेशन केले जात होते.

हायड्रोक्सिक्लोरोक्विन(HCQ)औषध

मुंबईतील धारावी, वरळी कोळीवाडा यासारख्या परिसर कोरोनाचा मुख्य हॉट्सपॉट असलेल्या परिसरातील लोकांना हायड्रोक्सिक्लोरोक्विन(HCQ)औषध देण्यात आले होते. हे औषध १५ वरिल सर्वांना देण्यात आले होते. तर ह्रदय रोग किंवा यकृताशी संबंधीत कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना हे औषध देण्यात आले नव्हते.


हेही वाचा – Maharashtra Lockdown 2021: मुंबई उपनगरीय लोकलमध्ये कोणाला प्रवेश मिळणार ?
Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -