घरमुंबईमोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे

मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे

Subscribe

गणपती मंडळे गेल्या काही वर्षांत आपल्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. अगदी फेसबुक, इन्स्टाग्रामपासून ते स्वतःच्या वेबसाईटही अनेक गणेशोत्सव मंडळांनी तयार केल्या आहेत. पण आपला गणपती काही ना काही वैशिष्ठ्यामुळे लोकप्रिय व्हावा, यासाठी आता गणपती मंडळेही आपल्या नावाच्या ब्रॅण्डिंगचाही आधार घेत आहे. मरीन लाईन्सच्या अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही आपल्या ४२ व्या वर्षात गणपतीच्या नावाच रिब्रॅण्डिंग केले आहे. गोड गणपती असे आता गणपतीसाठीच नवे नाव आहे.

अनंत चतुर्दशीला जेव्हा गणपतीची विसर्जन मिरवणूक निघते तेव्हा अनेक भाविकांकडून गणपतीवर साखर उधळली जाते. गेल्या १२ वर्षांपासून ही परंपरा गणेशोत्सव मंडळाशी जोडली गेली आहे. पण केवळ एक श्रद्धेचा भाग म्हणून आम्ही याकडे पाहतो. वास्तवात साखर उधळून वाया घालवण्यात येऊ नये म्हणून आम्ही काही वर्षांपासून साखर उधळण्याएवजी प्रसाद म्हणूनही वाटत आहोत. पण दरवर्षी आपल्या श्रद्धेचा भाग म्हणून ही परंपरा कायम आहे. म्हणूनच गणेशोत्सव मंडळाच नाव आम्ही गोड गणपती असे केले आहे, अशी माहिती मंडळाचे सरचिटणीस सुधीर साळवी यांनी दिली. दुधाचा अभिषेकही काही भक्तांकडून केला जातो, पण दूध वाया घालवण्यात येऊ नये असा आमचा मानस आहे. त्यामुळे आम्ही दुधाची नासाडी होणार नाही अशी काळजी घेतो असेही ते म्हणाले.

- Advertisement -

छोट्या गोष्टी दुर्लक्ष नको

अनेकदा आपण छोट्या छोट्या गोष्टी दुर्लक्षित करतो. म्हणूनच छोट्या गोष्टींचा मोठा परिणाम टाळण्यासाठीचे आवाहन करणारी चित्रफित आम्ही तयार केली आहे. एकट्या माणसाने कचरा फेकला तरीही असे अनेक कचरा फेकणारे हात मिळून कचर्‍याचा मोठा ढिग होतो. म्हणूनच आम्ही कचरा कुठेही फेकू नका असे आवाहन केले आहे. मतदान न केल्याने काय फरक पडतो अशी अनेकांची मानसिकता असतो. पण मतदान केल्याने मोठा फरक पडतो त्यामुळेच मतदानाकडे दुर्लक्ष नको, असेही आवाहन करण्यात आले आहे. त्यासोबत अन्नाची नासाडी करू नका असेही आवाहन या चित्रफितीत करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -