घरताज्या घडामोडीमंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे बोलावलं जाणार, जाणून घ्या

मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे बोलावलं जाणार, जाणून घ्या

Subscribe

मंत्रालयात गेल्या ८ दिवसात ३५हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. त्यामुळे मंत्रालयात होणारी गर्दी कमी करण्यासाठी सरकारकडून सूचना देण्यात आल्या. मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येतील याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना काल (मंगळवार) दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर मंत्रालयातील काम करत असलेल्या विभागांसाठी एक पत्र जारी करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन विभागाच्या सेक्रेटरीने कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राहण्याच्या संबंधित निर्णय घेण्यासाठी सांगितले आणि पर्याय दिला आहे.

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना बोलवण्यासाठी दिला ‘हा’ पर्याय

मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अल्टरनेट दिवशी बोलवा किंवा आठवड्यातून तीन दिवस बोलवा किंवा एक एक हफ्त्याच्या शिफ्ट बोलवा आणि नियमांचे पालन व्यवस्थित होत असेल तर सर्व कर्मचाऱ्यांना बोलवा, असा पर्याय दिला आहे. त्यामुळे आता संबंधित विभागाचे सेक्रेटरी काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष्य आहे.

- Advertisement -

मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुख्य सचिवांना दिले.

- Advertisement -

हेही वाचा – दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या नोंदणीत मुदतवाढ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -