Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई 'श्रीमंत कसे व्हायचे...', उद्धव ठाकरे यांनी चरित्र लिहिले पाहिजे; नितेश राणेंचा टोला

‘श्रीमंत कसे व्हायचे…’, उद्धव ठाकरे यांनी चरित्र लिहिले पाहिजे; नितेश राणेंचा टोला

Subscribe

मुंबई : 1 मे ला महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईच्या बिकेसीतील मैदानावर महाविकास आघाडीची तिसरी ‘वज्रमूठ’ सभा (MVA Vajramuth Meeting) पार पडली. या सभेमुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापयला सुरूवात झाली आहे. कालच्या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले की, श्रीमंत कसे व्हायचे, असे चरित्र अदानींवर लिहायला पाहिजे. या टीकेना उत्तर देताना भाजपा नेते नितेश राणे (Nitehs Rane) म्हणाले की, अदानींवर चरित्र लिहिण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी युवा तरुण-तरुणींसाठी चरित्र लिहिले पाहिजे.

कालच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केले होते की, गौतम अदानींवर कारवाई नको, पण त्यांच्यावर एक चरित्र लिहिले पाहिजे की, श्रीमंत कसे व्हायचे. या टीकेला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, मला अस वाटत अदानींवर चरित्र लिहिण्यापेक्षा प्रत्येक युवा तरुण-तरुणींनीसाठी उद्धव ठाकरे यांनी एक चरित्र लिहिलं पाहिजे. कुठलाही धंदा न करता, कुठलाही व्यवसाय न करता, कुठलाही ऑफीसचा पत्ता नसताना एवढी संपत्ती कशी जमवायची.

- Advertisement -

नितेश  राणे म्हणाले की, मातोश्री 2 उभी राहिली, मोठ्या गाड्या फिरवतात, यासाठी तुम्ही कोणता धंदा करतात आणि तुमच्या उत्पन्नाचा स्रोत काय, अशा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. त्यांनी असेही म्हटले की, अदानींच्या येवढ्या कंपन्या आहेत, त्यांचे येवढे उद्योग आहे. त्या माध्यमातून ते इथपर्यंत पोहचले आहेत, पण तुमचा इनकम येतो कुठुन. उद्धव ठाकरेंना कोणत्या कंपनीमधून हा सर्व उत्पन्न येतो आहे, हे आम्हाला माहित आहे.

उद्धव ठाकरेंच्या घरात फिरणाऱ्या गाड्या मराठवाड्याच्या कुठल्या आमदाराच्या नावाने आहेत. त्या आमदाराच्या मेडिकल महाविद्यालयात त्यांची भागिदारी आहे. स्वत:च्या पैशाने गाड्या फिरवायच्या नाही, तुम्ही जे दुसरं मातोश्री 2 बांधले आहे ते कोणाच्या पैशाने बांधले आहे. त्याही बद्दल तुमच्या चरित्रामध्ये लिहा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. त्यांनी म्हटले की, मराठी तरुणांना कळु दे उद्धव ठाकरे मालामाल विक्ली झाले कसे, तरुणांना हा फॉर्मला द्या, अशी विनंती नितेश राणे यांनी केली आहे. त्यांनी असेही म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांचे चरित्र लिहिण्यापेक्षा माझ्या महाराष्ट्राच्या मराठी तरुण-तरुणींसाठी त्यांचे आत्मचरित्र किंवा चरित्र बाहेर येऊ दे. उद्धव ठाकरे यांचे ‘अब्जाधीश कसे व्हावे’ हे पुस्तक बाहेर येऊ दे, असे नितेश राणे म्हणाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -