मुंबई : सध्या बेरोजगारांची वाढती संख्या पाहता, एखाद्या जॉबची संधी आली की कोणीही ती गमावू इच्छित नाही. परंतु, बऱ्याचदा अटी-शर्ती पाहता इच्छुक उमेदवार आधीच माघार घेतात. सध्या सोशल मीडियावर एका कंपनीच्या HRने केलेली लिंक्डइनवरील पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे मुंबईत एका नव्या वादाला तोंड फुटले असून या कंपनीच्या एचआरला ट्रोल करण्यात येत असून अनेकांनी कारवाईची मागणी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, मराठी लोकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गिरगावमधील कंपनीतून अशा प्रकारची जाहिरात समोर आल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. (HR Viral Post abaout Marathi People not allowed in post for graphic designer)
मुंबईतील एका कंपनीतील HR ने त्यांच्या संस्थेत एका ग्राफिक डिझायनरच्या रिक्त पदासाठी लिंक्डइनवर जाहिरात दिली होती. या जाहिरातीमध्ये त्या एचआरने त्यांना या पदासाठी कशा प्रकारचा उमेदवार हवा आहे, याबाबतची माहिती दिली. परंतु. या जाहिरातीच्या सुरुवातीलाच त्या एचआरने मराठी माणसाला इथे अर्ज करण्यास परवानगी नाही किंवा मराठी माणूस इथे अर्ज करु शकत नाही, अशी अट घातल्याने खळबळ उडाली. या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे, ही एचआर गुजरातची एक फ्रीलांस रिक्रुटर आहे. ज्यामुळे याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला.
या जाहिरातीमध्ये HR ने लिहिले होते की, मुंबईतील गिरगावमध्ये असलेल्या त्यांच्या कंपनीत एका ग्राफिक डिझायनरच्या शोधात आहे. कमीत कमी 1 वर्ष किंवा त्याहून जास्त असा अनुभव हवा. त्याशिवाय त्यांना उमेदवाराकडून कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत, याबाबतचीही त्यांच्याकडून माहिती देण्यात आली. परंतु, मराठी उमेदवार नको, या त्यांच्या एका अटीमुळे मराठी अनेकांनी संताप व्यक्त केला. कारण महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबई सारख्या शहरात अशी प्रकरणे घडतात, तेव्हा त्याबाबत खळबळ संताप व्यक्त करणे हे साहाजिकच आहे. त्यामुळे सध्या या एचआर विरोधात सोशल मीडियावर वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे.
या कंपनीच्या एचआरची पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. X या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक नेटकऱ्यांनी या जाहिरातीचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी या एचआरला ट्रोल करण्यास सुरुवात केली. हे पाहता काही काळानंतर ती पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आली आहे. पण तरी देखील त्या एचआरला ट्रोल करणे सुरूच आहे. तर या एचआरने माफीची पोस्ट करून देखील तिच्या विरोधात तक्रार करा, अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा… Water Crisis: राज्यात भीषण पाणीटंचाई; 2 हजार 344 गावांत 2 हजार 952 टँकर्स
Edited By : Poonam Khadtale