घरCORONA UPDATECoronaVirus: ...आणि फराह खानच्या घरातील स्टाफ निघाला कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus: …आणि फराह खानच्या घरातील स्टाफ निघाला कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

फराह खान यांनी स्वतः घरातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती ट्विटवरून दिली.

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन यांची माजी पत्नी सुझैन खान हिची बहिण आणि ज्वेलरी डिझायनर फराह खान अली यांच्या घरातील हाऊस स्टाफला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. फराह खान यांनी स्वतः याबाबतचे ट्विट करून सांगितले आहे. फराह खानने ट्विटरवर म्हटले आहे की, कोविड – १९ ची बातमी ही व्हायरसच्या तुलनेत अधिक जलद गतीने पसरते. माझ्या घरातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही त्याला पुढील उपचारासाठी पाठवत आहोत. तसेच घरातील सर्व सदस्यांची चाचणीही करून घेतली आहे. शिवाय आता आम्ही सगळेच क्वारंटाइन आहोत. तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. हेही दिवस जातील, असे भावनिक आवाहन फराह यांनी केले आहे.

- Advertisement -

सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. अनेक सेलिब्रिटींच्या संबंधीतही कोरोनाबाधित झालेल्यांची माहिती मिळत आहे. आता पुन्हा एकाद ज्येष्ठ अभिनेता संजय खान यांची मुलगी फराह खान यांच्या घरातच कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, अनेक सेलिब्रिटींनी फराहला रिट्विट करत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी या प्रसंगातून तू सुखरूप बाहेर येशील, असे म्हटले आहे.

हेही वाचा –

लॉकडाऊनमधील आर्थिक संकट टाळण्यासाठी हे ८ उपाय करा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -