घरताज्या घडामोडीमानखुर्दमध्ये भीषण आग, अग्निशनदलाच्या १५ - १६ गाड्या घटनास्थळी दाखल

मानखुर्दमध्ये भीषण आग, अग्निशनदलाच्या १५ – १६ गाड्या घटनास्थळी दाखल

Subscribe

मानखुर्द येथील मंडला परिसरात भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी तब्बल १५ ते १६ अग्नीशमनदलाच्या गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्नीशमनदलाचे जवान करत आहेत. दुपारी २:३० वाजताच्या सुमारास ही आग लागल्याचे स्थानिकांकडून समजते. मानखुर्द मंडला परिसरात आगीचे आणि धुराचे लोळ पहायला मिळत आहेत. या ठिकाणी लाकूड आणि अनेक ज्वालाग्राही पदार्थांच्या वखारी आहेत. त्याचबरोबर या परिसरात दाटीवाटीची मानवी वस्ती देखिल असल्याचे समोर येत आहे. आग लागलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ पहायला मिळत आहेत. मंडला परिसरात राहणाऱ्या स्थानिक लोकांनी सर्वात आधी आगीची माहिती मिळाली. स्थानिकांनी ही माहिती त्वरित अग्निशमनदलाला दिली. त्यानंतर आगीचे प्रमाण वाढत गेले.

मानखुर्द स्क्रॅप यार्ड आणि कुर्ला स्क्रॅप यार्ड असे या परिसराला म्हटले जाते. या ठिकाणी अनधिकृतरित्या काही सामानांचे उत्पन्न केले जाते. अनेकदा सांगूनही यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या वखारींमुळे दरवर्षी या ठिकाणी अशाप्रकारची आग लागते. या आगीमुळे इथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे मोठे नुकसान होते,असे स्थानिक आमदार अबु आझमी यांनी सांगितले. मानखुर्दच्या मंडला परिसरात भीषण आग लागली. या ठिकाणी अनेक अवैध धंदे चालतात. याबाबत अनेकदा राज्यसरकारला सांगूनही याबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, असा आरोप स्थानिक आमदार अबु आझमी यांनी केला आहे.

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -