भग्नावस्थेत असलेल्या इमारतीच्या आवारात खोदकामात सापडले मानवी अवयव

पोलिसांनी हे मानवी अवयव ताब्यात घेऊन तपासणीसाठी जे. जे. हॉस्पिटलला पाठवले आहेत

भग्नावस्थेत असलेल्या इमारतीच्या आवारात खोदकामात सापडले मानवी अवयव

भग्नाअवस्थेत असलेल्या इमारतीजवळ खोदकाम सुरू असताना मानवी अवयव मिळून आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी मुलुंड पश्चिम येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी हे मानवी अवयव ताब्यात घेऊन तपासणीसाठी जे. जे. हॉस्पिटलला पाठवले असल्याचे सांगितले जात आहे.

मुलुंड पश्चिम आर.एच.बी रोड या ठिकाणी मोडकळीस आलेल्या ‘साधना बिल्डिंग’ या इमारतीत मागील २५ ते ३० वर्षांपासून कोणीही राहत नाही. तेव्हापासून ही इमारत भग्नावस्थेत आहे. काही वर्षांपूर्वी ही इमारत एका विकासकाने घेतली असून त्या ठिकाणी नवीन टॉवर उभारण्याचे काम सुरू होणार होते. मात्र काही वादातून काही वर्षे हे काम थांबले होते. दरम्यान विकासकाने इमारतीच्या भोवताली पत्रे उभे केले होते.

बुधवारी ही इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यात आले होते, तत्पूर्वी मजुरांनी आजूबाजूचा परिसर खोदण्यास सुरुवात केली असता त्यांना खोदकामाच्या वेळी एक मानवी कवटी मिळून आली असता मजुरांनी काम सोडून तेथून पळ काढला होता. साधना इमारत ही परिसरात भूतबंगला म्हणून ओळखली जात असतांना या ठिकाणी मानवी कवटी मिळाल्याची चर्चा परिसरात होताच शुक्रवारी सकाळी काही जण या ठिकाणी बघण्यासाठी आले असता त्यांना मानवी कवटी दिसून आली, या मानवी कवटीची माहिती मुलुंड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्याम पोलिसानी मानवी कवटीचे इतर अवयवचा शोध घेण्यासाठी मजुरांकडून खोदकाम सुरू केले असता या ठिकाणी आणखी मानवी हाडे मिळून आली. मानवी पाय आणि हातचे हाडे मिळून आलेली असून इतर अवयवांचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी शुक्रवारी उशिरा पर्यंत खोदकाम सुरू ठेवण्यात आले आहे.पोलिसानी मानवी कवटी आणि हाडे ताब्यात घेतली असून ती तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब कडे पाठवण्यात आली असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे.

हे मानवी अवयव कुणाचे आहे, व या ठिकाणी कसे आले याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही इमारत गेली 25 ते 30 वर्षांपूर्वीपासून भग्नावस्थेत पडलेली असून या ठिकाणी गर्दुल्ले, नशेंडीनी आपला अड्डा बनवला होता, या नसेडीपैकी एखाद्याचे हे अवयव असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच एखाद्याची हत्या करून पुरवा नष्ट करण्याचा हेतूने मृतदेह या ठिकाणी गाडण्यात आला असावा, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.


सत्तेची हवा डोक्यात; क्षुल्लक कारणावरुन राष्ट्रवादीच्या आमदाराने मारली पोटात लाथ