घरमुंबईबेस्ट, रेल्वे, मेट्रोसाठी हायब्रिड मॉडेल

बेस्ट, रेल्वे, मेट्रोसाठी हायब्रिड मॉडेल

Subscribe

आयटीएस प्रणाली दोन टप्प्यात

उपनगरीय रेल्वे, बेस्ट, मेट्रो यांसारख्या सेवांसाठीची इंटिग्रेटेड टिकिटींग सिस्टिम (आयटीएस) प्रकल्पासाठी आता हायब्रीड मॉडेल अमलात आणण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. आयटीएस प्रकल्पांतर्गत रिफिल कार्डवर आधारित प्रवास करण्याची संधी प्रवाशांना सुरुवातीच्या टप्प्यात मिळणार आहे, तर भविष्यातील टप्प्यामध्ये ऑटो डेबिट पद्धतीने बँक खात्याशी संलग्न अशी पैसे भरून प्रवास करण्याची पद्धत प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. या संपूर्ण आयटीएस प्रकल्पासाठी एमएमआरडीए नोडल एजन्सी असणार आहे.

एमएमआरडीएमार्फत पुरवण्यात येणारे रिफील कार्ड हे बँक खात्याशी संलग्न असणे ऑटो डेबिट मॉडेलमध्ये अपेक्षित आहे. त्यानुसार प्रवाशांना उपनगरीय लोकल, बेस्ट, मेट्रो अशा वाहतूक प्रकल्पांचा वापर करताना आधी कार्डसाठीचे पैसे रिफिल करावे लागतील. प्रवासाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर हे पैसे कार्डमधून वजा होणार आहेत. सर्व प्रकारच्या प्रवासासाठी हे कार्ड वापरणे शक्य होईल. ज्यात ओला, उबेर, रोरो फेरी सेवा आणि ऑटो – टॅक्सी सेवांचा समावेश आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या प्रकल्पाचा पहिला टप्पा एक वर्षात राबवण्याचा आमचा मानस आहे, असे एमएमआरडीएचे सह आयु्क्त संजय खंदारे म्हणाले.

- Advertisement -

तीन मेट्रो मार्गांसाठी ५ लाख कार्ड
दहिसर ते डी एन नगर (मेट्रो २ अ), डी एन नगर ते मानखुर्द (मेट्रो २ ब) आणि मेट्रो ७ प्रकल्पासाठी स्वयंचलित भाडे प्रणाली पुरवण्याची जबाबदारी डाटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हीसेस लिमिटेडला एमएमआरडीएमार्फत देण्यात आले आहे. या तिन्ही प्रकल्पासाठी एकूण ५ लाख कार्ड प्रवाशांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे मेट्रोचे जाळे आणि भविष्यातील प्रवास भाडे यंत्रणेचा अंदाज घेऊन तिकीट प्रणाली अमलात येणार आहे, असे एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -