घरताज्या घडामोडीमुंबईला हायपर टेन्शन मुक्त करण्याचा पालिकेने उचलला 'विडा'

मुंबईला हायपर टेन्शन मुक्त करण्याचा पालिकेने उचलला ‘विडा’

Subscribe

मुंबईत 'कोरोना'ला यशस्वीपणे तोंड देणाऱ्या मुंबई महापालिकेने आता हार्टटॅक, किडनी, ब्रेन स्ट्रोक यांसारख्या मोठ्या आजारांना 'हायपर टेन्शन' हे कारणीभूत आहे. हायपर टेन्शनला नियंत्रणात आणण्यासाठी पालिका आरोग्य यंत्रणा आता आशा वर्कर, सीएचव्ही यांच्यामार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यासाठी 'विशेष मोहीम' हाती घेणार आहे

मुंबईत ‘कोरोना’ला यशस्वीपणे तोंड देणाऱ्या मुंबई महापालिकेने आता हार्टटॅक, किडनी, ब्रेन स्ट्रोक यांसारख्या मोठ्या आजारांना ‘हायपर टेन्शन’ हे कारणीभूत आहे. हायपर टेन्शनला नियंत्रणात आणण्यासाठी पालिका आरोग्य यंत्रणा आता आशा वर्कर, सीएचव्ही यांच्यामार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यासाठी ‘विशेष मोहीम’ हाती घेणार आहे. तसेच, प्रत्येक रुग्णालयात हायपर टेन्शन कॉर्नर सुरू करणार आहे. मुंबईला ‘हायपर टेन्शन मुक्त’ करण्याचा ‘विडा’ च महापालिकेने उचलला आहे. (Hypertension corner will be started in every hospital by bmc)

यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी दिली. याप्रसंगी, पालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, उपायुक्त संजय कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

धावत्या मुंबईत मुंबईकरांचे जनजीवन हे सततच्या धावपळीचे झाले आहे. मुंबईकरांची लाइफस्टाइलही वेगळी आहे. घरचे कमी आणि बाहेरचे, रस्त्यावरचे खाणे जास्त असते. नाश्ता, जेवण आदी अवेळी खाणे, आवश्यक विश्रांती वेळेत न घेणे, कामाचा प्रचंड ताण डोक्यावर घेणे आदी कारणांमुळे मुंबईत अनेकांना ‘हायपर टेन्शन’ च्या आजाराने ग्रासले आहे. मुंबईत ‘कोरोना’ ग्रस्त अनेक रुग्णांच्या मृत्यूला ‘हायपर टेन्शन’ हेसुद्धा कारण असल्याचे त्यावेळी समोर आले होते.

मुंबई महापालिकेने मुंबईत पाच हजार व्यक्तींचे सर्वेक्षण केले असता त्यामध्ये, ३४ टक्के मुंबईकरांमध्ये ‘हायपर टेन्शन’ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे डब्ल्यूएचओ च्या सर्वेक्षणात तर ८० ते ८८ टक्के लोक हायपर टेन्शन उपचार घेत नसल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

महापालिका आरोग्य विभागाने हायपर टेन्शनचा आजार असलेल्या व्यक्तींचा प्रशिक्षित आशा वर्कर, सीएचव्ही यांच्यामार्फत प्रथम झोपडपट्टीत,नंतर मध्यमवर्गीय वसाहतीत, श्रीमंत वसाहतीत सर्वेक्षण करून शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विषेश मोहीम हाती घेण्यात येणार आहे. जे कोणी हायपर टेन्शन ग्रस्त आढळून येतील त्यांचे बीपी तपासून त्यांना तत्काळ मोफत औषधोपचार देण्यात येणार आहे.

येत्या ऑगस्टमध्ये या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच, पुढील सात – आठ महिन्यात याच मोहिमेत कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर, मधुमेह यासह इतर आजारांचाही समावेश केला जाणार असल्याचे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या मोहिमेत चांगले काम करणाऱ्या आशा वर्कर, सीएचव्ही यांचे मानधन वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा – राज्यात 2 हजार 203 नवे कोरोना रुग्ण; 3 जणांचा मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -