घरमुंबईहायपरटेंशनचा विळखा राज्यातील ८ लाख लोक त्रस्त तरूणांमध्ये प्रमाण अधिक

हायपरटेंशनचा विळखा राज्यातील ८ लाख लोक त्रस्त तरूणांमध्ये प्रमाण अधिक

Subscribe

तरुणांचे प्रमाण अधिक

बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, डोकेदुखी, हृदयविकार अशा आजारांचे प्रमाण वाढले आहे. या आजारांचा प्रभाव फक्त ज्येष्ठांमध्येच नाही तर सर्वात जास्त तरुणांमध्येही पाहायला मिळतो. या सर्व आजारांमध्ये हायपरटेंशन म्हणजेच उच्च रक्तदाब हा सध्या वाढताना दिसून येत आहे. राज्याच्या आरोग्य संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ८.८ लाख लोक हायपरटेंशनच्या विळख्यात अडकले आहेत. म्हणजेच, महाराष्ट्रातील एकूण ३० टक्के लोकांना त्याचा त्रास आहे. त्यात २० ते ६०वर्षे वयोगटातील लोकांचा सर्वात जास्त समावेश आहे. हायपरटेंशन एक सायलेंट किलर म्हणजे हळूहळू वाढत जाणारा आजार आहे. ज्याचा परिणाम हृदय, किडनी आणि शरीरातील इतर अवयवांवर होतो. रक्तात जास्त प्रमाणात कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हा आजार जडतो.

यावर मात करण्यासाठी रोज व्यायाम आणि खूप आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून अशा रुग्णांना दिला जातो. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात, घर किंवा बाहेर, चिंता, काळजी आणि सतत असणारा राग आपल्या हृदयावर आणि शरीराच्या इतर भागांवर परिणाम करतो. आपल्या हृदयामुळे शरीरात रक्तप्रवाह सुरू असतो. धमन्यांमधून शरीराच्या इतर भागांमध्ये शुद्ध रक्त जाते आणि शरीराच्या इतर भागांपासून दूषित रक्त हृदयाकडे परत येते. ब्लड प्रेशर रक्ताला पंप करणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे रक्तदाब हा एक रोग नाही तर ती सामान्य प्रक्रिया आहे. पण, जेव्हा काही प्रमाणात हा दाब कमी किंवा जास्त होतो तेव्हा त्याला उच्चरक्तदाब किंवा कमी रक्तदाब म्हणतात. हायपरटेन्शन ही सध्या लोकांमध्ये एक सहज उद्भवणारी समस्या आहे. त्यामुळे त्याला सायलेंट किलर असंही म्हणतात.

- Advertisement -

आरोग्य संचालनालयाच्या असंसर्गजन्य आजार नियंत्रण विभागाकडून राबवण्यात आलेल्या शिबिरांमार्फत गेल्या ५ वर्षात २ कोटी ६८ लाख लोकांची तपासणी केली गेली आहे. त्यात ८.८ लाख लोकांना उच्चरक्तदाब असल्याचं समोर आलं आहे. ज्याचं प्रमाण शहरी भागात ३० टक्के आहे. तर, ग्रामीण भागात हे प्रमाण ५ ते १० टक्के आहे. तसंच, ८.८ लाख लोकांपैकी जवळपास ७.७ लाख लोकांनी हायपरटेंशनवर वेगवेगळ्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले आहेत, अशी माहिती असंसर्गजन्य रोगनियंत्रण विभागाच्या सहसंचालक डॉ. साधना तायडे यांनी ‘आपलं महानगर’ ला दिली आहे.

दरवर्षी राज्याच्या आरोग्य विभागाकडून नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजेच संसर्गजन्य नसणार्‍या आजारांसाठी अनेक शिबिरे घेतली जातात. त्यात डायबिटीस, तोंडाचं आरोग्य आणि हायपरटेंशन या आजारांचा समावेश केला जातो. या शिबिरांतर्गत आतापर्यंत जवळपास २ कोटींपेक्षा जास्त लोकांची तपासणी केली गेली आहे. सर्वात जास्त उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळले आहेत. ८ लाख लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. ज्यापैकी ७ लाख रुग्ण शासकीय हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत आहेत. बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे हा आजार बळावला आहे. त्यामुळे, लोकांनी कामाचा ताण, अतिकाळजी आणि त्यातून जडणार्‍या व्यसनांपासून दूर राहणं आवश्यक आहे.
– डॉ. साधना तायडे, सहसंचालक, असंसर्गजन्य रोगनियंत्रण विभाग, आरोग्य संचालनालय

- Advertisement -
मुंबईत २३ टक्के लोकांना उच्च रक्तदाब

पालिकेच्या चार प्रमुख हॉस्पिटल्समध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईत रक्तदाब असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीत तब्बल ७३ लाख ७४ हजार ६०२ रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील २३ टक्के लोक हे उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळले आहेत.
आजच्या विकसनशील देशांमध्ये जीवनशैली, ताण, प्रदूषण, कामाच्या ठिकाणी असलेले वातावरण आणि खानपानाच्या सवयींमुळे दर पाचपैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. भारतीय आकडेवारीनुसार, २०२५ सालापर्यंत दोनपैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाब असेल. निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत थोडी तरी शिस्त पाळणे आवश्यक आहे.
– डॉ. प्रतीक सोनी, हृदयविकार तज्ज्ञ,वोक्हार्ट हॉस्पिटल.

आरोग्य संघटना काय म्हणते?

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, वेळेआधी मृत्यू होण्यासाठी उच्च रक्तदाब हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. २००५ साली करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार २०.६ टक्के भारतीय पुरुष आणि २०.९ टक्के भारतीय महिलांना उच्च रक्तदाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २००८ सालच्या आकडेवारीनुसार भारतीयांमध्ये उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींच्या संख्येत ३२.५ टक्के (पुरुषांमध्ये ३३.२ टक्के तर महिलांमध्ये ३१.७ टक्के) वाढ झाली आहे. तर, ऑनलाईन सर्वेक्षणामध्ये २० ते ३० या वयोगटातील ५०० व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यापैकी २१८ जणांना रक्तदाबाची सामान्य पातळी ९० ते १४० असते हे माहीतच नव्हते.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -