Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई मी या आधीच सांगितले होते...; सत्तासंघर्षाच्या निर्णयावर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया

मी या आधीच सांगितले होते…; सत्तासंघर्षाच्या निर्णयावर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : शिवसेनेतून फुटलेले १६ आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे आदेश आज (11मे) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहे. या १६ आमदारांमध्ये पहिले नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. हा निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना वेळेचे बंधन दिलेले नाही. परंतु विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) कधी निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लंडनवरून प्रतिक्रिया देताना म्हटले की, “अपात्रतेचा निर्णय फक्त अध्यक्षच घेऊ शकतात, हे मी या आधीच सांगितले होते. कारण संविधानात तशी तरतूद आहे आणि सर्वोच्च न्यायालयानेही तसाच निर्णय दिला आहे. कायद्यातील तरतुदींचं विश्लेषण सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. व्हीप कोणी दिला पाहिजे आणि राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व कोण करतं हा निर्णयही अध्यक्षांनी घ्यायचा असतो. अधिकृत व्हीप कोणाचं, राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व कोण करतं, तसेच अपात्रतेसाठी करण्यात आलेल्या याचिका वैध आहेत की नाही, यासंबंधित निर्णय अध्यक्ष घेतील, असेही मी यापूर्वीही सांगितले होते, असा पुनरुच्चार राहुल नार्वेकर यांनी केला.

- Advertisement -

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. त्यांनी लंडन दौऱ्यावर जाण्यापूर्वी सांगितले होते की, दौरा पूर्वनियोजित होता आणि या दौऱ्याचा सत्तासंघर्षाच्या निकालाशी संबंध नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाने आता विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर अपात्रतेचा निर्णय घ्यावा असे आदेश दिल्यामुळे ते आता कधी येणार आणि कधी निर्णय घेणार अशा उलटसुलट चर्चा सोशन मीडियावर सुरू झाल्या आहेत.

न्यायालयाने अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केला
सत्तासंघर्षाच्या निकालाबद्दल सांगायचे झाले तर, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शाह, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. आर. नरसिम्हा यांच्या घटनापीठाने हा निकाल गुरुवारी दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निकाल वाचन केले. सुमारे ३५ मिनिटे न्यायालयाने निकाल वाचन केले. यामध्ये १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -