घरमुंबईमला काही माहिती नाही, माझा काही संबंध नाही!

मला काही माहिती नाही, माझा काही संबंध नाही!

Subscribe

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा सीबीआय चौकशीत ‘नाना’चा पाढा

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या ‘१०० कोटी वसुली लेटरबॉम्ब’ प्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर बुधवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची साडेआठ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीत सीबीआय अधिकार्‍यांकडून विचारण्यात येणार्‍या प्रश्नांना ‘माझा काही संबंध नाही, मला यातील काहीच माहिती नसल्याचे’ त्यांनी उत्तर दिले असल्याचे सीबीआय सूत्रांकडून समजते. या प्रकरणात सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्यासह सात जणांचे जबाब नोंदवण्यात आले. मुंबई पोलीस आयुक्त पदावरून पायउतार करण्यात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

हे प्रकरण उच्च न्यायालयात जाताच न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले होते आणि १५ दिवसात चौकशीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात यावा, असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानुसार सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना बुधवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. बुधवारी सकाळी १० वाजता देशमुख हे डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये हजर झाले होते. कलिना येथील डीआरडीओच्या कार्यालयात ही चौकशी सुरू होती. तब्बल साडेआठ तास चौकशी करण्यात आली. सीबीआयचे अधीक्षक दर्जाचे अधिकारी आयपीएस अभिषेक दुलार आणि किरण एस यांच्याकडून माजी गृहमंत्री देशमुख यांची चौकशी झाली. चौकशीदरम्यान अनिल देशमुख यांनी बहुतांश आरोप फेटाळले. त्यांच्यावर झालेले सर्व आरोप तथ्यहीन आणि चुकीचे असल्याचा दावा देशमुखांनी केला आहे, असे सूत्रांकडून समजते.

- Advertisement -

महाराष्ट्राला आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा काही अधिकार्‍यांचा हा प्रयत्न आहे, असेही देशमुख म्हणाले. डीसीपी राजू भुजबळ आणि एसीपी संजय पाटील यांनी त्यांच्या जबाबात स्पष्ट केलेय की मी त्यांना कोणतीही वसुली करायला सांगितलेले नव्हते. मुंबई पोलिसांनी केलेल्या अंतर्गत चौकशीत ही बाब समोर आली होती. त्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य नाही, असे देशमुख यांनी सीबीआय चौकशीत म्हटल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत सात जणांचे जबाब नोंदवून घेतले असून त्यात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह एसीपी संजय पाटील, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे, अ‍ॅडव्होकेट जयश्री पाटील, माजी गृहमंत्री याचे स्वीय सहायक कुंदन शिंदे आणि संजय पालांडे आणि स्वतः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -