घरताज्या घडामोडी'नाईटलाइफ'च्या निर्णयावर मुख्यमंत्री म्हणतात...

‘नाईटलाइफ’च्या निर्णयावर मुख्यमंत्री म्हणतात…

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'नाईटलाइफ'च्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईमधील मॉल्स, हॉटेल्स आणि पब्जना २४ तास खुले ठेवण्याचा प्रस्ताव पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडला होता. विशेष म्हणजे २६ जानेवारीपासून तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. मात्र, या संकल्पनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले असून ‘मला नाईटलाइफ हा शब्दच आवडत नाही’, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

यावेळी ते पुढे म्हणाले की, ‘नाईटलाइफ संकल्पना राज्यभरात लागू करण्याचा सध्या विचार नाही, प्रत्येक शहराची स्वतंत्र संस्कृती असते. मुंबईतल्या काही भागात आम्ही हा प्रयोग करणार आहोत. मला मुळात नाईटलाइफ हा शब्द आवडत नाही. एकदा आम्ही मॉल्स आणि हॉटेल्स यांना २४ तास खुले ठेवण्याची परवानगी देणार आहोत. त्यानंतर याचा आढावा आणि परिणाम याची माहिती घेऊन पुढचा निर्णय घेऊ, असे देखील त्यांनी सांगितले आहे. याबाबत वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जगभरात अनेक ठिकाणी ही संकल्पना लागू आहे. पण सर्व लोक पंचतारांकित हॉटेल्समध्ये जात नाहीत. तर ते मॉल्स किंवा छोट्या हॉटेल्समध्ये जाणे पसंत करतात.

- Advertisement -

हेही वाचा – ‘नाईट लाईफमुळे ‘निर्भया’सारख्या शेकडो घटना घडतील’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -