Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई मी आईच्या मृतदेहाचे तुकडे केले, रिंपलच्या जबाबाने गुंतागुंतीची झाली केस

मी आईच्या मृतदेहाचे तुकडे केले, रिंपलच्या जबाबाने गुंतागुंतीची झाली केस

Subscribe

मुंबई : मुंबईतील लालबाग परिसरातील आईची (वीणा जैन) हत्या करणाऱ्या मुलीला (रिंपल जैन) सोमवारी (20 मार्च) न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीशांनी आईला मारून तिचे तुकडे का केले? असा प्रश्न रिंपल जैनला विचारला. यावर तिने आईची हत्या केली नसल्याचे म्हटल्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण येण्याची शक्यता आहे. रिंपलने सांगितले की, मी आईची हत्या केली नसून मी फक्त मृतदेहाचे तुकडे केले आहेत. या प्रकरणात न्यायालयाने रिंपल जैनला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या लालबाग परिसरामधून वीणा जैन यांच्या हत्येचे प्रकरण पोलीस आणि घराशेजारी राहणाऱ्या लोकांच्या समोर ज्या पद्धतीने आले त्यामुळे सर्वच चकीत झाले होते. कारण रिंपल जैन हिने तिच्या आईच्या मृतदेहाचे तुकडे करून ते प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून कपाटात गेल्या तीन महिन्यापासून घरात लपवून ठेवले आणि तिथेच राहत होती. तिने आईच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा वास येऊ नये म्हणून २०० परफ्युमच्या बाटल्या, ४० एअर फ्रेशनर्स आणि फिनेलच्या बाटल्या असे सर्व घरात आणून ठेवले होते.

- Advertisement -

आठवड्याभरापूर्वी तिचा भाऊ जेव्हा तिला भेटायला गेला होता तेव्हा त्याला घरात दुर्गंधी आली. त्यामुळे त्याने वीणा जैन कुठे आहेत हे रिंपलला विचारल. तिने वीणा जैन कानपूरला गेल्याचे सांगितले. मात्र घरात एक वेगळ्याच प्रकारची दुर्गंधी येत असल्याने त्याला संशय आला आणि ही बाब पोलिसांना सांगितली. पोलिसांनी रिंपलच्या घराची झडती घेतली असता त्यांना घरात वेगवेगळ्या ठिकाणी वीणा जैन यांच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. त्यानंतर रिंपलला अटक करण्यात आली आणि तिला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. रिंपलने न्यायालयात आपण आई वीणा जैनची यांची हत्या केली नसून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचे मान्य केले आहे. या प्रकरणात न्यायालयाने रिंपल जैनला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतो की, वीणा जैन यांची हत्या रिंपल जैन हिने केली की अजून कुणी केली हे थोड्यात दिवसात समजेल.

रिंपल जैनने न्यायालयात सांगितल की, “२७ डिसेंबर २०२२ ला माझी आई पहिल्या मजल्यावरून खाली पडली होती. जवळपासच्या हॉटेलच्या दोन मुलांनी तिला वर उचलून आणले, मात्र तिचा मृत्यू झाला होता. त्यावेळी माझ्या मनात विचार आला की, आईचा मृत्यू खाली पडून झाला हे सर्वांना सांगितल तर सगळा आळ माझ्यावर येईल. त्यामुळे राहते घर आणि मामाकडे असलेले आईचे बँकेतले पैसे मिळणार नाहीत. याच भीतीने मी आईच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि घरात वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवले.

- Advertisement -

१४ मार्चला प्रकारणे आले समोर
वीणा जैन यांच्या मृत्यूचे प्रकरण १४ मार्चला समोर आले. वीणा जैन यांची हत्या त्यांची मुलगी रिंपल जैन हिने केली असल्याचे समोर आले. पोलिसांनी रिंपलच्या घराची झडती घेतली असता त्यांना घरातून इलेक्ट्रॉनिक मार्बल कटर, कोयता, चाकू मिळाले, जे मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आले होते. मृतदेहाचे तुकडे करून प्लास्टिकच्या पिशवीत कपाट, ड्रम, फ्रिज या ठिकाणी ठेवले होते. या सगळ्यातून दुर्गंधी पसरू नये म्हणून रिंपलने एअर फ्रेशनर्स, २०० परफ्युमच्या बाटल्या आणि फिनेलच्या बाटल्या हे सगळ पोलिसांनी घराच्या झडतीमध्ये मिळाले.

क्राईम शो पाहून केली हत्या
पोलिसांच्या माहितीनुसार रिंपलने क्राईम शो पाहत असल्यामुळे तिला हा गुन्हा करण्यास सोपे गेले. तसेच रिंपलने तिच्या मोबाईलमध्ये गुगलवर डेडबॉडीचे विघटन कसे करायचे हे शोधले होते. याशिवाय तिने परफ्युम आणि एअर फ्रेशनरचा वापर दुर्गंधी कमी करण्यासाठी केला असेही पोलिसांनी म्हटले आहे.

- Advertisment -