घरमुंबईमुख्यमंत्रीपदाबाबत पंकजा मुंडेंनी केली इच्छा व्यक्त, म्हणाल्या...

मुख्यमंत्रीपदाबाबत पंकजा मुंडेंनी केली इच्छा व्यक्त, म्हणाल्या…

Subscribe

पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. मला सध्या मुख्यमंत्री व्हायची इच्छा नाही, असे त्या म्हणाल्या आहेत. त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पंकाजा मुंडे मुंबईतील एका खासगी वृत्त पत्राच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी, अजिबात नाही. सध्या जे चालू आहे ते पाहता मी आहे तिथेच बरी आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा –  संभाजीराजे छत्रपतींना मान खाली घालायला लावू नका : पंकजा मुंडे

देवेंद्र फडणवीस सकारात्मक –

- Advertisement -

यापूर्वी पंकाज मुंडे यांनी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य गाजल्यानंतर भाजपमधील राजकीय समीकरणे वेगाने बदलली होती. मात्र, यावेळी पंकजा मुंडे यांनी विधानपरिषद निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) आमच्या मोठ्या नेत्या आहेत. आमच्याकडून त्यांच्या नावाला पूर्ण पाठिंबा आहे. काही निवडणुकांमध्ये त्यांचे नाव चर्चेत येते. ते साहजिकच आहे. त्यांचे नाव चर्चेत येणे यात काहीच वावगे नाही. त्या कोणत्याही पदासाठी पात्र आहेत. आमच्या त्यांच्या नावाला पाठिंबा आहे. आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत. याबद्दलचा निर्णय आमचे हायकमांड घेतील, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले होते.

हेही वाचा – ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका धक्कादायक, न्यायालयात दाद मागणार – पंकजा मुंडे

दहाव्या जागेसाठी चुरस होण्याची शक्यता –

20 जूनला विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूका होणार आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे 4, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे 4 काँग्रेसचा 1 आणि 10 व्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होण्याची शक्यता आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -