घरताज्या घडामोडीइंदिरा गांधी - करीम लाला भेटीचे वक्तव्य मागे; संजय राऊत यांची माघार

इंदिरा गांधी – करीम लाला भेटीचे वक्तव्य मागे; संजय राऊत यांची माघार

Subscribe

इंदिरा गांधी - करीम लाला भेटीच्या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी आज माघर घेतली आहे.

इंदिरा गांधी – करीम लाला भेटीच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी आज अखेर माघर घेतली आहे. या संदर्भात त्यांनी खुलासा केला असून ते म्हणाले आहे की, ‘ज्यांना मुंबईचा इतिहास माहित नाही अशांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. तसेच जे मी वक्तव्य केले आहे त्यामधून जर कोणाला वाटत असेल की, मी इंदिरा गांधी यांचा अनादर केला आहे म्हणून तर मी माझे वक्तव्य मागे घेत आहे. त्याचप्रमाणे माझ्या या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या मित्रांनी नाराज होण्याची गरज नाही’, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माघार घेतली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले संजय राऊत?

करीम लाला हा पठाण कम्युनिटीचा नेता होता. तसेच पख्तुन-ए-हिंद नावाची संघटनाही तो चालवत होता. त्याचप्रमाणे त्याच्या संघटनेची ताकद एवढी होती की, अनेक दिग्गज नेते त्याला भेटण्यासाठी येत होते आणि त्यामध्ये इंदिरा गांधींचाही समावेश होता. मात्र, मी जे बोललो त्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण देखील संजय राऊत यांनी केले आहे.

दरम्यान, इंदिराजी माझ्यासाठी व्यक्तीश: आदरणीय राहिल्या. कुणी त्यांच्या अभद्र टिपणी केली किंवा त्यांचे नेतृत्व कमी दाखवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मीही इंदिराजींची बाजू घेतली. इतकेच नाही तर नेहरू आणि राजीव गांधी यांचीही बाजू घेतली आहे. इंदिराजी या देशाच्या सर्वोच्च शक्तिमान नेत्या होत्या. प्रखर राष्ट्रभक्त नेत्या होत्या. शिवसेना आणि इंदिराजींचे मधुर संबंध राहिले. बाळासाहेब आणि इंदिराजीचे मजबूत संबंध होते आणि आमच्याकडून कोणतेही विधान झालेले नाही ज्यातून इंदिराजींच्या प्रतिमेला तडा जाईल.

- Advertisement -

हेही वाचा – सातारा: राऊत आणि आव्हाडांच्या नावाची पाटी गाढवाला लावून काढली धिंड


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -