सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण लॉकडाऊन लावला पाहिजे – महापौर किशोरी पेडणेकर

Mumbai Mayor Kishori Pednekar

राज्यात कोरोना विषाणू कहर कायम आहे. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत ६० हजारांची भर पडत आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे संकेत अनेक मंत्री देत आहे. आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील सध्या परिस्थितीकडे पाहता संपूर्ण लॉकडाऊन लावला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. १४ तारखेच्या रात्री ८ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. पण तरी देखील राज्यातील अनेक लोकं बिनधास्तपणे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत. त्यामुळे सध्या संपूर्ण लॉकडाऊनचा इशारा अनेक मंत्री देत आहेत.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ‘९५ टक्के मुंबईकर कोरोना निर्बंधांचे पालन करीत आहे. पण उर्वरित ५ टक्क लोकं नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे आणि यांच्यामुळे इतरांना समस्या येत आहेत. सध्याची कोरोनाची परिस्थितीत पाहता संपूर्ण लॉकडाऊन लादला पाहिजे, असे मला वाटते.’

मुंबईत शुक्रवारी ८ हजार ८३९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ५३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ६१ हजार ९९८वर पोहोचली आहे. यापैकी आतपर्यंत १२ हजार २४२ जणांचा मृत्यू झाला असून ४ लाख ६३ हजार ३४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ८५ हजार २२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान शुक्रवारी दिवसभरात ५० हजार ५३३ कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ४८ लाख ५१ हजार ७५२ कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत.


हेही वाचा – कोरोना विषाणू हवेतून पसरतोय, कोरोनाची नियमावली त्वरीत बदला – द लॅन्सेट रिपोर्ट