घरताज्या घडामोडीIAS प्रवीण परदेशी यांची केंद्रात नियुक्ती

IAS प्रवीण परदेशी यांची केंद्रात नियुक्ती

Subscribe

गेल्या अनेक महिन्यापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची केंद्रात राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक झाली आहे. केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी योजनेच्या अंतर्गंत महत्त्वाचा घटक असलेल्या राष्ट्रीय निर्माण आयोगासाठी पंतप्रधानांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली असून त्याच्या अध्यक्षपदी क्लॉलिटी कंट्रोल ऑफ इंडियाचे प्रमुख आदिल जैनुलभाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, प्रशासन सदस्यपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

pravin pardeshi

- Advertisement -

परदेशी हे १९८५च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी याआधी मुख्यमंत्री कार्यालयाची जवाबदारी सांभाळलेली होती. याशिवाय वन, पर्यावरण, नगर विकास तसेच महसूल अशा विविध विभागांत यशस्वीपणे जवाबदारी सांभाळलेली आहे. गेल्या वर्षी मुंबई महापालिका आयुक्तपदावरून तडकाफडकी उचलबांगडी झाल्यानंतर नाराज झालेल्या परदेशी यांनी संयुक्त राष्ट्रात सेवा केली. तेथून राज्यात परतल्यावर त्यांनी मुख्य सचिवपदासाठी प्रयत्न केले होते. मात्र, या पदाने त्यांना हुलकावणी दिली. गेल्या अनेक महिन्यापासून राज्य प्रशासनात नियुक्ती मिळत नसल्याने शेवटी परदेशी यांनी केंद्रात जाणे पसंत केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -