Tuesday, April 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सीताराम कुंटे मुख्य सचिव, मनुकुमार श्रीवास्तव अतिरिक्त मुख्य सचिव(गृह)

सीताराम कुंटे मुख्य सचिव, मनुकुमार श्रीवास्तव अतिरिक्त मुख्य सचिव(गृह)

Related Story

- Advertisement -

राज्याच्या मुख्य सचिव पदावर १९८५ च्या बॅचचे सनदी अधिकारी सीताराम कुंटे यांची नेमणुक झाली आहे तर अतिरिक्त मुख्यसचिव गृह या पदावर मनुकुमार श्रीवास्तव यांची नेमणुक करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार हे २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळेच या रिक्त झालेल्या पदासाठी सीताराम कुंटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. सध्या सीताराम कुंटे यांच्याकडे गृह विभागाची अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून जबाबदारी आहे. सीताराम कुंटे हे गेल्या ३६ वर्षांपासून प्रशासकीय सेवेत आहेत. त्यांनी या कालावधीत अनेक महत्वाच्या अशा पदावर अनेक जबाबदाऱ्यांचे काम केले आहे. सुरूवातीच्या काळात सीताराम कुंटे हे १९९३ आणि १९९५ मध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच मुंबई महापालिकेत ते २००१ या कालावधीत महापालिका उपायुक्त म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. त्यानंतर २००१ ते २००५ या कालावधीत त्यांच्याकडे मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त अशी जबाबदारी आली. त्यानंतरच्या काळात २०१२ ते २०१५ या कालावधीत त्यांच्याकडे मुंबई महापालिका आयुक्त अशी जबाबदारी होती. त्यांच्या म्हाडाचे उपाध्यक्ष, उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव अशीही जबाबदारी त्यांच्याकडे होती. काही वर्षे त्यांच्याकडे पर्यावरण विभागाचाही चार्ज होता. तसेच महाराष्ट्राच्या राज्यपालांचे प्रधान सचिव म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती. सीताराम कुंटे यांनी गृह विभागाची जबाबदारी २७ ऑगस्ट २०२० रोजी घेतली.

संजय कुमार हे प्रशासकीय सेवेतील पहिले मुख्यसचिव असतील ज्यांनी आपल्या सेवानिवृत्तीनंतर मुदतवाढ मागितलेली नाही. संजय कुमार यांची वर्णी येत्या दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या सचिव पदावर होण्याची शक्यता आहे. राज्य वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांचा कार्यकाळ संपल्यानेच संजीव कुमार यांना ही संधी मिळू शकते. ही जागा ४ जानेवारीपासून रिक्त आहे. याआधी संजय कुमार यांना नेमणुक देण्यासाठी महारेरा अध्यक्षपदाची चर्चा होती. पण या जागेवर माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांची नेमणुक करण्यात आली आहे.

- Advertisement -

सीताराम कुंटे हे ५९ वर्षांचे असून येत्या नोव्हेंबर रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मार्च ते नोव्हेंबर हा अवघ्या ९ महिन्यांचाच कालावधी त्यांच्याकडे राज्याचे मुख्य सचिव ही जबाबदारी असेल. राज्याच्या मुख्य सचिव पदाच्या स्पर्धेत सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी हेदेखील होते. पण परदेशी यांच्याकडे सध्या संयुक्त राष्ट्राच्या इंस्टिट्यूट फॉर ट्रेनिंग एण्ड रिसर्चमध्ये जागतिक पातळीचे कार्यक्रम समन्वय म्हणून जबाबदारी आहे. संयुक्त राष्ट्राच्या नॉन कम्युनिकेबल डिजिजसाठी जगभरातील ९० देशांमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमाचे ते जागतिक पातळीवरील समन्वयक आहेत.

सीताराम कुंटे मुख्य सचिव पदी 30 नोव्हेंबर २०२१ पर्यंत कार्यरत असतील यानंतर त्यांची नोव्हेंबर रोजी निवृत्ती होती. सीताराम कुंटे यांनी पुण्यामध्ये जिल्हाधिकारी, धुळे जिल्हाधिकारी, मुंबई पालिका उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आयुक्त आणि आयुक्त या पदांवरही कामकाज केले आहे. तसेच त्यांनी गृहनिर्माण विभागाचे सचिव म्हणूनही कामकाज पाहिले आहे. सीताराम कुंटे यांची कारकिर्द पारदर्शक आणि प्रामाणिक राहिली आहे. त्यांच्यावर एकाही बाबतीत आरोप नाही तसेच ते एक उत्तम प्रशासक म्हणूनही ओळखले जातात.


- Advertisement -

 

- Advertisement -