घरताज्या घडामोडीउद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ; झेडवरून Z+ करण्याचा केंद्राचा निर्णय

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ; झेडवरून Z+ करण्याचा केंद्राचा निर्णय

Subscribe

रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सुरक्षा झेडवरून झेडप्लस करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सुरक्षा झेडवरून झेडप्लस करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आयबीने गुप्त माहिती दिल्यानंतर तातडीने मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे समजते. (IB Secret Report Mukesh Ambani Security increased from Z to Z Plus)

मिळालेल्या माहितीनुसार, अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याच्या प्रकरणानंतर त्यांची सुरक्षा वाढविण्याचा विचार सुरु होता. दरम्यान, सद्यस्थितीत पेमेंट बेसिसवर त्यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. इंटेलिजन्स ब्युरोने मुकेश अंबानींच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल केंद्राल सादर केला आहे. यलो बुक ऑफ सिक्युरिटीनुसार ज्या व्हीव्हीआयपींना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा दिली जाते, त्यांच्याभोवती कडेकोट बंदोबस्त असतो.

- Advertisement -

‘अशी’ असते Z+ श्रेणीची सुरक्षा

  • 58 कमांडो तैनात असतात.
  • 10 सशस्त्र स्टॅटिक गार्ड.
  • 6 पीएसओ.
  • 24 जवान.
  • 2 एस्कॉर्ट 24 तास.
  • 5 वॉचर्स 2 शिफ्टमध्ये तैनात.
  • एक इन्स्पेक्टर किंवा सबइन्स्पेक्टर प्रभारी म्हणून तैनात.
  • व्हीआयपींच्या घरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांच्या तपासणीसाठी 6 फ्रीस्कींग आणि स्क्रीनिंग करणारे तैनात.
  • ६ ड्रायव्हर देखील आळीपाळीने ड्युटीवर असतात.

झेड प्लस सुरक्षा व्यतिरिक्त मुकेश अंबानी यांनी वैयक्तिक सुरक्षा देखील घेतलीये. अंबानी यांच्यासोबत 20 वैयक्तिक सुरक्षा कर्मचारी असतात. जे पूर्णपणे प्रशिक्षित आहेत. या सुरक्षा रक्षकांना इस्रायलमधील सुरक्षा-कंपनीने प्रशिक्षण दिले आहे. या सुरक्षा रक्षकांमध्ये निवृत्त लष्कर आणि NSG जवानांचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – घटस्फोटीत पतीला पत्नीने चहा-नाश्ता द्यायची गरज नाही, कोर्टाचा निर्णय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -