ICSI CSEET चा निकाल जाहीर ; ‘या’ वेबसाईटवर पाहा तुमचा निकाल

इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने (Institute of Company Secretaries of India, ICSI) सीएसईईटी नोव्हेंबरमध्ये झालेल्या या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. आयसीएसआयतर्फे नोव्हेंबर सत्राच्या कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्टच्या निकालाची लिंक सक्रिय करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार https://icsi.edu/home/ या परीक्षेच्या निकालाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येऊ शकतो. ICSI CSEET १३ नोव्हेंबर आणि १४ नोव्हेंबर २०२१ ला घेण्यात आली.या परीक्षेच्या निकालासोबत प्रत्येक उमेदवाराच्या गुणांचा विषयवार तपशील ICSI द्वारे प्रसिद्ध केले जाणार असून, हा तपशील डाऊनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ICSI CSEET निकाल 2021 अशाप्रकारे तपासा

icsi.edu येथे ICSI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या ICSI CSEET निकाल 2021 लिंकवर क्लिक करा.

लॉगिन क्रेडेन्शियल्स सबमिट करा.

परिणाम स्क्रीनवर दिसून येईल.

डाउनलोड करा आणि निकाल तपासा.

निकालाची प्रिंट काढा.


हे ही वाचा -“मी दुबईला चाललोय” सरकारी यंत्रणांनी माझ्यावर नजर ठेवावी, मलिकांच्या ट्विटचा रोख कुणावर?