Ranichi baug : वाघ,सिंहासाठी राणीची बाग ICU ने सुसज्ज ; प्राण्यांचे आरोग्य सुधारणार

प्राण्यांच्या उपचारासाठी अडथळे दूर होणार

ICU for tiger, lion in Ranichi baug
Ranichi baug : वाघ,सिंहासाठी राणीची बाग ICU ने सुसज्ज ; प्राण्यांचे आरोग्य सुधारणार

भायखळामधील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात म्हणजेच राणीच्या बागेत आता प्राण्यांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार असून,प्राण्यांच्या आरोग्याची चिंता मिटणार आहे. या रुग्णालयात प्राण्यांसाठी अतिदक्षता विभागाचीही (ICU) सुविधा असणार आहे. राणीच्या बागेत सध्या लहान प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी सुसज्ज रुग्णालयं उपलब्ध आहेत. मात्र राणीच्या बागेत आता वाघ, बिबट्यादेखील दाखल झाला आहे. येणाऱ्या वर्षात राणीच्या बागेतील प्राण्यांच्या आरोग्याची विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. राणीची बाग म्हटलं की लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचीच पावले वन्यजीवांना पाहण्यासाठी थबकतात.हरीण,वाघ,हत्ती,तरस,सिंह अशा अनेक वन्यजीवांच्या पिंजऱ्यांकडे बच्चेकंपनी तसेच प्रौढही आकर्षित होत असतात.सेच पेंग्विन कक्षाकडेही पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावताना पाहायला मिळत आहे.

मात्र या प्राण्यांना अनेकदा आजाराच्या समस्या उद्भवतात,त्यांमुळे मोठ्या प्राण्यांसाठी रुग्णालयं सुसज्ज नसल्यामुळे उपचारासाठी अनेक अडथळे निर्माण होतात. पुढील काळात कांगारू, झेब्रा, जिराफ असे परदेशातील प्राणी तर देशातील इतर भागातून सिंहाशिवाय इतर प्राणी आणण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्राण्यांच्या आजारावर मात करण्यासाठी पाच हजार चौरस फुटांचे रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राणीच्या बागेत या रुग्णालयाचे काम सुरू करण्यात आले आहे, असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले. प्राण्यांसाठी सर्व आवश्‍यक सुविधा उपलब्ध असतील या रुग्णालयात असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

प्राणीसंग्रहालयातील यंत्रणा सुसज्ज करणार

प्राण्यांच्या सुरक्षतेसाठी प्राणिसंग्रहालयाभोवती आवश्‍यक भिंती आणि काटेरी तारेचे कुंपणही बांधण्यात येत आहे. रुग्णालयाबरोबरच पक्षी आणि इतर प्राण्यांचे विलगीकरण कक्ष करण्यात येणार आहे. माकडांसाठी प्रदर्शन सुविधा तसेच मगर आणि सुसरींसाठी पाणी नेहमी स्वच्छ राहील,अशी यंत्रणा बसवण्यात येणार असून, त्यांना पाण्याखाली पोहताना पाहण्यासाठी पारदर्शक गॅलरीही बांधण्यात येणार आहे. राणीच्या बागेतील या सुविधांकरिता पालिका प्रशासन ६० कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च करणार आहे.


हे ही वाचा : ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा भयावह विषय : चंद्रकांत पाटील