घरमुंबईआमच्या हातात ईडी दिली तर फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील - संजय राऊत

आमच्या हातात ईडी दिली तर फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील – संजय राऊत

Subscribe

राज्यसभा निवडणुकीत झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. अपक्ष आमदारांबाबत काही बोलायचे नाही. . त्यांचा अपमान करायचा नव्हता, असे सांगत भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी दोन दिवस आमच्या हातात ईडी दिली तर देवेंद्र फडणवीस ही शिवसेनेला मतदान करतील, टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊत यांनी केली. यावेळी त्यानी केंद्र सरकारवर गंभीर आरोपही केले.

संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांबाबत काही काही करणार नाही. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. कोणत्याही आमदारांचा अवमान करण्याचा प्रश्न नाही. आम्ही काय बोलतो हे त्यांनाही माहीत आहे. आणि भाजपलाही माहीत आहे. आमच्या हाता दोन दिवस ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतादान करतील, असे संजय राऊत म्हणाले

- Advertisement -

 एक विजय झाला, एक पराभव झाला म्हणजे अणूबॉम्ब कोसळला असे होत नाही –

अपक्ष आमदारांनी कुणाला पाठिंबा दिला हे आम्हाला संगळे माहीत आहे. म्हणून बोललो. विषय संपला. एक विजय झाला, एक पराभव झाला म्हणजे अणूबॉम्ब कोसळला असे होत नाही. महाप्रलय आला असे होत नाही. अनेक राज्यात असा निकाल लागला आहे. राजस्थानात काँग्रेस जिंकली. हरियाणात रडीचा डाव करून अजय माकन यांचा पराभव केला. महाराष्ट्रात आयोगाला हाताशी धरून इथले लोकं काय करत होते सर्व माहीत आहे. गृहखात्याकडून निवडणूक आयोगाला कसे फोन जात होते कुणाचे मत बाद करायचे यावर कशी चर्चा सुरू होती हे सर्व माहीत आहे. यंत्रणा आमच्याकडेही आहेत. फक्त ईडी नाही. फक्त ईडी आमच्याकडे 48 तासासाठी दिली तर भाजपही आम्हाला मतदान करेल, असे ते म्हणाले.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस सामना वाचतात – 

आम्ही दैनिक सामना वाचत नाही या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. सर्वात आधी चंद्रकांत पाटील सामना वाचतात. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील पूर्वी चोरून सामना वाचायचे. आताही वाचतात, असा चिमटा त्यांनी काढला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -