घरCORONA UPDATEBMC चे कठोर पाऊल; मास्क न वापरल्यास होणार कडक कारवाई

BMC चे कठोर पाऊल; मास्क न वापरल्यास होणार कडक कारवाई

Subscribe

कोरोनाच्या संकटकाळात सोशल डिस्टन्सिंगसह मास्क परिधान करणे बंधनकारक असल्याच्या सुचना वारंवार आरोग्य विभागाकडू करण्यात येतात. मात्र तरीही काही ठिकाणी मास्क न वापरता नागरिक फिरताना दिसतात. यावर आता मुंबई महापालिकेने कठोर पावले उचलत कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज, मंगळवारी दिले आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यासाठी मुंबई पोलीस दल, वाहतूक पोलीस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. मुंबई महापालिकेच्‍या सर्व २४ विभागांच्‍या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक परिसरांमध्‍ये ‘विना मास्क’ वावरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई आता अधिक कठोरपणे राबवण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी प्रभाग स्तरीय नियोजन करण्याचे व त्यासाठी संबंधित प्रभागातील नगरसेवकांचे सहकार्य घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

काय आहेत नियम 

  • ‘विना मास्क’ विषयक दंडात्मक कारवाईसाठी मुंबई पोलीस दल व वाहतूक पोलीस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई नियमितपणे करण्यात येईल
  • यासाठी महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या स्तरावर ‘संयुक्त कारवाई आराखडा’ तयार करण्याचे व त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • दुकानदार, विक्रेते, दुकान-उपहारगृहे इत्यादी ठिकाणी काम करणारे विक्रेते व कर्मचारी, प्रभात फेरीला (मॉर्निंग वॉक) जाणारे नागरिक इत्यादींवर देखील ‘विना मास्क’ विषयक कारवाई करण्यात येणार आहे.
  • आवश्यकतेनुसार संबंधित कलमांन्वये कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा –

आत्महत्येचं गुढ! कुंडलीत योग; दोन सख्ख्या भावांनी एकामागोमाग दिला जीव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -