घरमुंबईउद्धव ठाकरे यांनी बोलावल्यास आम्ही नक्की जाऊ, दीपक केसरकरांनी केले स्पष्ट

उद्धव ठाकरे यांनी बोलावल्यास आम्ही नक्की जाऊ, दीपक केसरकरांनी केले स्पष्ट

Subscribe

दीपक केसरकरांनी यांनी बंडखोर गटाकडून एक मोठे विधान केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यास आम्ही नक्की जाऊ, असे दीपक केसरकर यांनी म्हंटले आहे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांनी रोखठोकपणे महाविकास आघाडीविरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. यावेळी दीपक केसरकरांनी यांनी बंडखोर गटाकडून एक मोठे विधान केले आहे.

संजय राऊतांवर बंडखोर आमदारांची टीका –

- Advertisement -

संजय राऊत यांच्यामुळे हे प्रकरण चिघळले. त्यांनी अत्यंत वाईट भाषेचा वापर केला. त्यामुळे आमदारांच्या मनात अधिक राग निर्माण झाल व त्यामुळेच उठाव केला, असे आमदारांनी म्हटले आहे. संजय राऊत उरलीसुरली शिवसेना संपवतील, असा दावा बंडखोर आमदारांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले दीपक केसरकर – 

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यास आम्ही नक्की जाऊ, असे मोठे विधान दीपक केसरकर यांनी केले आहे. आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू. मात्र, आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावेत. दरम्यान आता आम्ही भाजपासह असल्यामुळे त्यांच्यासोबतही संवाद साधावा लागेल, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

आता तुम्हाला भगवा ठामपणे पकडायचा आहे- उद्धव ठाकरे

मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पुण्यातील शिवसैनिकांसोबत संवाद साधला. यावेळी आपली शिवसेना एकच आहे आणि एकच राहणार, असे सांगत धनुष्यबाण आपलाच आहे, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. तुम्हाला भगवा आता ठामपणे पकडायचा आहे, असे म्हणत शिवसैनिकांनी जोमाने काम करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. कुणाच्याही दबावाला बळी पडू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी साद उद्धव ठाकरे यांनी उपस्थित असणाऱ्या शिवसैनिकांना दिली. आतापर्यंत ज्यांना देता येणे शक्य होते, तेवढे दिले. मात्र ,त्यांनी शेवटी गुण दाखवले. आता मात्र तुम्हाला देता येण्यासारखे माझ्याकडे काहीही नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -