Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर सुरक्षा दिली असती तर हल्ला झालाच नसता; सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीची खंत

सुरक्षा दिली असती तर हल्ला झालाच नसता; सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीची खंत

Subscribe

सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. हल्ल्याबाबत त्यांना विचारले असता मला जर सुरक्षा दिली असती तर हल्लाच झाला नसता अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

बीड : शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या प्रवक्त्या सुषमा अंधारे ह्या त्यांच्या आक्रमक भाषणशैलीमुळे महाराष्ट्रभर परिचित आहेत. त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत मात्र, यावेळी वेगळ्याच कारणाने. सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. हल्ल्याबाबत त्यांना विचारले असता मला जर सुरक्षा दिली असती तर हल्लाच झाला नसता अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.(If security had been provided the attack would not have happened Sushma Andharens estranged husband regrets)

ठाकरे गटात सक्रीय प्रवक्त्या असलेल्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे हे त्यांचा पुतण्यासोबत 17 सप्टेंबरच्या मध्यरात्री बीड जिल्ह्यातील होळवरून आडसकडे जात असताना याच प्रवासादरम्यान नगरहून आडसकडे जात असताना होळजवळ काही अज्ञातांनी वैजनाथ वाघमारे यांच्या कारच्या समोर येऊन दगडफेक केली. यामध्ये वैजनाथ वाघमारे हे थोडक्या बचावले असून, त्यांचा पुतण्या मात्र जखमी झाला आहे. याबाबत त्यांनी आपल्याला सुरक्षा हवी असतानाही दिली जात नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या संसदेत दिला ‘या’ आठवणींना उजाळा

मुख्यमंत्र्यांकडे केली होती सुरक्षेची मागणी

हल्ल्यानंतर वैजनाथ वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली असून, माझ्यावर हल्ला करणारे हे अज्ञात असून, मी वारंवार सांगत होतो की, माझ्या जीवाला धोका आहे. तेव्हा मला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती. मात्र, माझ्या मागणीचा विचार केल्या गेला नसल्यानेच हा प्रकार घडला असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

हेही वाचा : काहीपण बोलून मोकळं व्हायचं…, गुंतवणूक आणि रोजगारावरून भाजपा आणि मविआत जुंपली

या कारणामुळे झाला आमचा घटस्फोट

वैजनाथ वाघमारे यांना सुषमा अंधारेपासून विभक्त होण्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नये असे मला वाटत होते. त्या भाडोत्री वाहन म्हणून राष्ट्रवादीत गेल्या. त्यानंतर आमच्या नात्याला खरा तडा गेला. त्यांचे विचार वेगळे राहिले आणि माझे विचार वेगळे राहिले अशीही प्रतिक्रिया वैजनाथ वाघमारे यांनी दिली आहे.

अंधारेंना नेताच करायचं होतं

पुढे बोलताना वैजनाथ वाघमारे म्हणाले की, सुषमा अंधारे आंबेडकरी चळवळीच्या मुलुख मैदानी तोफ होत्या. मला त्यांना नेताच करायचे होते. मला त्यांना झोपडपट्टीत पाठवायचे नव्हते किंवा ऊसतोड कामगार, विटभट्टी कामगार म्हणून पाठवायचे नव्हते. परंतू वेगळा मार्ग निवडला तेव्हापासून आमच्या दोघांमध्ये कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

- Advertisment -