घरताज्या घडामोडीदुकानांवर ३० जूनपर्यंत मराठीत पाट्या न लावल्यास कारवाईचा बडगा

दुकानांवर ३० जूनपर्यंत मराठीत पाट्या न लावल्यास कारवाईचा बडगा

Subscribe

मुंबईतील (Mumbai) दुकाने, हॉटेल्स, आस्थापनावर दर्शनीय ठिकाणी मराठी भाषेत व मोठ्या अक्षरात पाट्या, नामफलक न लिहिल्यास पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

मुंबईतील (Mumbai) दुकाने, हॉटेल्स, आस्थापनावर दर्शनीय ठिकाणी मराठी भाषेत व मोठ्या अक्षरात पाट्या, नामफलक न लिहिल्यास पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांनी दिली आहे. (If signs are not put up in Marathi on shop by June 30 action will be taken)

राज्य सरकारतर्फे (State Government) राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स, आस्थपना येथे दर्शनीय ठिकाणी मराठी भाषेत व ठळक अक्षरात नामफलक, पाट्या लिहिणे ३१ मेपर्यंत बंधनकारक करण्यात आले होते. मात्र मुंबईतील काही व्यापारी संघटनांनी मुंबई महापालिकेकडे (BMC) पुढील सहा महिने मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यावर पालिकेने ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा एकदा व्यापारी संघटनांनी सहा महिने मुदतवाढ मागितली.

- Advertisement -

नामफलक दुरुस्ती, पेंटिंगसाठी कारागीर मिळत नाहीत. जे कारागीर मिळतात ते छोट्याशा कामांसाठी जास्त पैसे मागतात, अशी कारणे देत मुदतवाढ देण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली. मात्र पुन्हा मुदतवाढ देण्यास पालिकेने स्पष्ट नकार दिला आहे.

मुंबईत सध्या ५ लाख दुकाने, हॉटेल्स, अस्थपना आदी आहेत. जर ३० जूनपर्यंत दुकाने, हॉटेल्स या ठिकाणी मराठी भाषेत व ठळक अक्षरात नामफलक, पाट्या न लावल्यास पालिकेकडून संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांनी सांगितले. तसेच, मद्यविक्रेत्या दुकानांना यापुढे महान व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत. याबाबतची कार्यवाही करण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

- Advertisement -

पालिका पथक पाहणी करणार

दुकाने, हॉटेल्स,आस्थापनांवर मराठी नामफलक, पाट्या लावण्याची कार्यवाही झाली की नाही याबाबतची खातरजमा पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाकडून प्रत्येक वॉर्डमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी ७५ इन्स्पेक्टर असणार आहेत. त्यांच्यासोबत एक सुविधाकारही असणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त शर्मा यांनी यावेळी दिली.

प्रति कामगारामागे २ हजारांचा दंड

जर हॉटेल, दुकान मालक आदींनी नियमानुसार, मराठी भाषेत पाटी लावण्यास नकार दिल्यास न्यायालयात खटला दाखल केला जाईल. मात्र ज्यांना न्यायालयीन कारवाई नको असेल तर त्यांना दंड भरावा लागणार आहे. यामध्ये, त्या दुकान, हॉटेल्स, आस्थापना येथील एका कामगारामागे दोन हजार रुपयांचा दंड न्यायालयीन कारवाईनंतर वसूल केला जाणार आहे.


हेही वाचा – मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; IMDकडून ऑरेंज अलर्ट जारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -