Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई पुढची मविआची सभा मुंबईत झाल्यास ती मंगल कार्यालयात घ्यावी लागले - नितेश...

पुढची मविआची सभा मुंबईत झाल्यास ती मंगल कार्यालयात घ्यावी लागले – नितेश राणे

Subscribe

मुंबई : 1 मे ला महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईच्या बिकेसीतील मैदानावर महाविकास आघाडीची तिसरी ‘वज्रमूठ’ सभा (MVA Vajramuth Meeting) पार पडली. या सभेमुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापयला सुरूवात झाली आहे. भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या सभेवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, कालच्या सभेमुळे शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे पुढची वज्रमूठ सभा मुंबईत झाल्यास ती मंगल कार्यालयात घ्यावी लागेल.

नितेश राणे म्हणाले की, काल संजय राजाराम राऊत यांच्या मालकाने महाविकास आघाडी म्हणून बिकेसीच्या सर्वात लहान अशा कोपऱ्यामध्ये सभा घेतली आणि त्या सभेमध्ये काही विषय मांडले. परंतु कालची जी काही वज्रमूठ सभा झाली त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची एवढी वाईट अवस्था आता झालेली आहे की, पुढची महाविकास आघाडीची सभा मुंबई झाली तर ती कुठल्यातरी मंगल कार्यालयात घेण्याची वेळ येणार आहे, असा माझा ठाम विश्वास असल्याचे नितेश राणे म्हणाले.

- Advertisement -

त्यांनी सांगितले की, कालची एकंदरीत जी गर्दी आलेली होती, त्या गर्दीत 80 टक्के अल्पसंख्या समाजाचे लोक होते. तो मूळ मतदारसंघ ईशान सिद्दीकीचा आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे महाराष्ट्र जिंकण्याची भाषा करतात, पण नाकाखालचा मतदारसंघ त्यांनी काँग्रेसकडे देऊन ठेवलेला आहे. 80 टक्के लोक अल्पसंख्या समाजाचे होते, त्यामुळे जितेंद्र आव्हाड मध्ये-मध्ये हिंदीमध्ये बोलत होते. आमच्याकडे अशी माहिती आलेली आहे की, त्या गर्दीमधील मुसलमान अल्पसंख्या समाजाच्या लोकांना टोप्या काढून बसायला सांगितले होते. आता नेमके उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाचा हाच अर्थ आहे का? हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे.

बाळासाहेबांना कालची सभा बघितल्यानंतर किती त्रास झाला असेल हा विचार आपण करू शकत नाही. काल सभेमध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी माझ्या पत्रकार परिषदेबद्दल उल्लेख केला. तस म्हटल तर अजित पवार यांना सगळचं माफ आहे, ते करमुक्त आहेत. म्हणून त्यांच्यावर मी टीका करणार नाही. पण मी संजय राजाराम राऊतांच्या मालकांना (उद्धव ठाकरेंना) सांगेन तुमच्यावर बोलण्यानंतर तुम्हाला खूप झोमतं. तुम्ही तिनपाट बिनपाट बोलणार, पण तुमचा सकाळचा कर्मचारी जो काही भोंगा रोज सकाळी येऊन काही वर्षांपासून आमच्या नेत्यांवर केंद्र आणि राज्याच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका करतात. ते तुम्हाला ऐवढे वर्ष दिसले नाही. ही तर माझी पाचवीच पत्रकार परिषद आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंना मी सांगेन फक्त दोन टक्केच माहिती मी बाहेर काढली आहे. अजून 98 टक्के माहिती बाहेर यायची बाकी आहे. पण मी पहिल्या पत्रकार परिषदेला सांगितले होते, मी किती माहिती बाहेर काढावी, किती माहिती महाराष्ट्राला सांगावे हे तुमच्या कामगारावर अवलंबून आहे. तुमचा कामगार रोज सकाळी येऊन माझ्या नेत्यावर, माझ्या पक्षावर बोलायच बंद करेल तर माझी पत्रकार परिषद बंद होईल. यासाठी पहिलं तुमच्या त्या शकुनी मामाला सांगा तुझं सकाळचं दहा वाजताचं थोंबाड बंद कर. मुद्द्यावर बोल, खोटेनाटे आरोप करायचे नाही, वैयक्तिक टीका करायची नाही, नाहीतर पाच पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला एवढी आग लागली आहे, तर माझ्या अजून पत्रकार परिषद होत राहिल्या तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे अवघड होऊन जाईल, अशी धमकी नितेश राणे यांनी दिली आहे.

- Advertisment -