Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन आमिरच्या लेकीचे चुकीचं नाव घ्याल तर बसेल 5 हजारांचा दंड

आमिरच्या लेकीचे चुकीचं नाव घ्याल तर बसेल 5 हजारांचा दंड

मात्र सध्या इरा तिच्या नावामुळे फार त्रस्त असल्याची दिसून आली. यावेळी तिने चाहत्यांबाबत एक तक्रार व्यक्त केली आहे.

Related Story

- Advertisement -

आमिर खानची लेक इरा खान ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. इराने अद्याप चित्रपट सृष्टीत पदार्पण केले नसले तरी इतर बॉलिवूड कलाकारांना लाजवेल असा इराचा चाहतावर्ग आहे. जगभरातील लाखों प्रेक्षक तिला फॉलो करतात. इरा नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. मात्र सध्या इरा तिच्या नावामुळे फार त्रस्त असल्याची दिसून आली. यावेळी तिने चाहत्यांबाबत एक तक्रार व्यक्त केली आहे. प्रत्येकजण तिच्या नावाचा चुकीचा उच्चार करत आहे व त्यामुळे तिला मानसिक त्रास होत आहे. असे ती म्हणाली आहे. याबाबत तिने एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत इराने तिचे नाव चुकीच्या पद्धतीने उच्चारले जात असल्याची तक्रार केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

 यामुळे तिचे मित्र-मैत्रीणदेखील आता खिल्ली उडवू लागले आहेत. या व्हिडिओतून तिने तिचं नाव नेमकं उत्चारावे तरी कसे हे सांगताना, माझं नाव इरा नसून ते आयरा आहे. जो कोणी माजं नाव यापुढे चुकीचं उच्चारेल त्याला ५ हजार रुपये द्यावे लागतील. महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटी मी ते दान करेन, असे इरा म्हणाली आहे.काही दिवसांपूर्वीच आयराने तिला डिप्रेशनचा सामना करावा लागल्याचे सांगितले होते. शिवाय यानंतर आयराने मानसिक स्वास्थासाठी काम करायला सुरुवात केली आहे. यासाठी तिला २५ इंटर्नची गरज असल्याचेही तिने सोशल मीडियावरुन सांगितले होते.


- Advertisement -

हे वाचा- कॉमेडियन कपिल शर्मा ने जाहिर केले मुलाचे नाव

- Advertisement -