घरमुंबईरुपाली चाकणकरांचे गौतमी पाटीलसंदर्भात मोठे वक्तव्य

रुपाली चाकणकरांचे गौतमी पाटीलसंदर्भात मोठे वक्तव्य

Subscribe

मुंबई | “तुमच्या दृष्टीकोनातून या दोन्ही व्यक्ती तुम्हाला अश्लील वाटत असतील. तर बाकीच्या दृष्टीकोनातून त्यांना ते शील वाटत असेल. त्यामुळे आपण कोणतीही कारवाई करू शकत नाही. पण, आपण त्यांना समज देऊ शकतो”, असे वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केले आहे. लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील आणि बोल्ड आणि हटक्या फॅशन सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) या दोघीसंदर्भात रुपाली चाकणकर यांनी वक्तव्य केले आहे. रुपाली चाकणकरांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्तता वर्तवली जात आहे. रुपाली चाकणकरांनी भंडारामध्ये एका कार्यक्रमासाठी गेले असताना पत्रकारांनी गौतमी पाटील (Gautami Patil) ही महाराष्ट्रच्या संस्कृतीचे विकृती करण करत आहे ते योग्य वाटते का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

गौतमी पाटील ही महाराष्ट्रच्या संस्कृतीचे विकृती करण करत आहे ते योग्य वाटते का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर रुपाली चाकणकर म्हणाल्या, “निश्चतपणाने हे योग्य नाही. पण, यामध्ये राज्य महिला आयोगाकडे ज्या तक्रारी येतात, त्या तक्रारींची दखल घेऊन राज्य महिला आयोग संबंधित व्यक्ती आणि विभाग कधी एखादी संस्था यांच्याकडे ते पाठवित असतात. राज्यघटनेने तुम्हाला मला जो अधिकार दिला आहेत. तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा अधिकार दिलेला आहे. भाषा स्वातंत्र्यचा आधिकार दिलेला आहे. यामुळे कोणी काय घालावे, काय बोलावे, काय खावे हे कोण कोणाला सांगू शकत नाही. ते घटना तुम्हाला मला माणूस म्हणून जण्याचा अधिकार देत असताना शील आणि अश्लील यांची परिभाषा आपण करू शकत नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट जर अश्लिल वाटत असेल तर ती दुसऱ्या व्यक्तीला शील वाटते. त्यामुळे शील आणि अश्लील ही परिभाषा स्थळ काळ परतवे बदलत राहते. अशी कोणतीही व्याख्या कायद्यात नाही. तुमच्या दृष्टीकोनातून या दोन्ही व्यक्ती तुम्हाला अश्लील वाटत असतील. तर बाकीच्या दृष्टीकोनातून त्यांना ते शील वाटत असेल. त्यामुळे आपण यावर कोणतीही कारवाई करू शकत नाही. पण, आपण त्यांना समज देऊ शकतो. यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पाहाता. सगळ्या गोष्टींची परिमाने ठरलेली असतात. त्याच्या पलीकडे जाऊन आपण कोणतीही सूचना करू शकत नाही.”

- Advertisement -

सध्या गौतमी पाटील यांना वाढदिवस किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले जाते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान गर्दी पाहायला मिळते. गौतमी पाटील तिच्या कार्यक्रमासाठी आयोजकांना तारखा मिळवण्यासाठी रांगा लावून बसलेले आहेत. तसेच गौतमी पाटील तिच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुण नेहमी गोंधळ घालतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -