घरCORONA UPDATECoronaEffect : हॉस्पिटल स्टाफसाठी IIT मुंबईने बनवले मास्क!

CoronaEffect : हॉस्पिटल स्टाफसाठी IIT मुंबईने बनवले मास्क!

Subscribe

कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेले मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाल्याने डॉक्टरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमधील हॉस्पिटलमधील कर्मचारीआणि सुरक्षारक्षकांसाठी आयआयटी मुंबईतील प्राध्यापकांनी नेहमीच्या वापरातील वस्तूंपासून विशेष मास्क बनवले आहे.

आयआयटी मुंबईतील प्राध्यापक आणि आयडीसी स्कूल ऑफ डिझाईन विभागातील प्राध्यापकांनी एकत्र येऊन हे मास्क तयार केले आहेत. हे मास्क बनवताना त्यांनी नेहमीच्या वापरातील वस्तूंचा वापर करून बनवले आहेत. त्यांनी १६ तासांमध्ये ४० मास्क बनवले असून पुढील काही दिवसांत १००० मास्क बनवण्याची योजना त्यांनी आखली आहे. हे मास्क कॅम्पसमधील सुरक्षारक्षक आणि हॉस्पिटलमधील स्टाफला वापरण्यासाठी देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

सॅनिटायझर बनवणाऱ्या यंत्रावर काम सुरू

बाजारात सॅनिटायझरचा असलेला तुटवडा लक्षात घेऊन आयआयटी मुंबईतील प्राध्यापक अंबरीश कुंवर, प्रा. कुमारेसन आणि प्रा. पूर्बा जोशी यांनी सॅनिटायझर बनवणारी दोन यंत्रे तयार केली आहेत. स्टील आणि अल्युमिनियमपासून बनवलेली ही यंत्रे पोर्टेबल आहेत. ही यंत्र बनवण्यासाठी त्यांना अवघे चार तास लागले!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -