घरमुंबईकल्याण एसटी डेपो अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या विळख्यात

कल्याण एसटी डेपो अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या विळख्यात

Subscribe

जीवघेण्या प्रवास करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूकीकडे कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिंसाची मात्र डोळेझाक.

कल्याण एसटी डेपो सध्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या विळख्यात सापडला आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणारे चालक थेट एसटी स्थानकात उभे राहत आहेत. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीला मोठा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे एसटीचे लाखो रूपयांचे उत्पन्न बुडत आहे. मात्र जीवघेण्या प्रवास करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूकीकडे कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलीस डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. कल्याण रेल्वे स्थानकजवळ असलेला कल्याण एसटी डेपो हा सन १९७२ साली सुरु झाला. सध्या कल्याण एसटी आगराच्या ताप्यात ७५ बसेस असून, या राज्यातील कानाकोपऱ्यात धावत असतात. महिन्याला ८ लाख प्रवासी एसटी बसमधून प्रवास करत आहेत.

आर्थिक नुकसान

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून तोटा सहन करत एसटी धावत असून टुमदार आणि सुरक्षित प्रवास देणाऱ्या एसटीला सध्या अवैध प्रवासी वाहतुकीचा चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. कल्याणच्या बस डेपो बाहेरच कल्याण आळेफाटा, मुरबाड, पडघ्याकडे जाणाऱ्या अवैध गाड्या उभ्या असतात आणि प्रवासीही घेऊन जातात. प्रवाशांना अक्षरशा कोबून बसविले जाते. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाचाही प्रश्न तितकाच गंभीर बनला आहे. पण या प्रकाराकडे वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. रेल्वे स्थानका जवळ एसटी डेपो असल्याने रेल्वे मधून आलेल्या प्रवाश्यांना घेण्यासाठी रिक्षा चालकांची झुंबड उडालेली असते. कल्याण एसटी डेपो मधून पडघा, भिवंडी, श्रीमलंग, आळेफाटा, अहमदनगर, पुणे या मार्गावर जाणाऱ्या प्रवाश्यांना आवाज देत चक्क प्रवासी पळवून नेले जातात. त्यामुळे त्याचा फटका एसटीला सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

कारवाईसाठी डेपोची तक्रार

कल्याण ते आळेफाटा कल्याण ते नगर या मार्गावर गर्दी असते. दर अर्ध्या तासाला या ठिकाणी जाणाऱ्या गाडया आहेत. नगरला जाणाऱ्या गाडया आहेत. कल्याण डेपोबरोबरच इतर डेपोच्या गाडयांची वाहतूकही सुरु असते. अवैध प्रवासी वाहतूकसंदर्भात एसटी महामंडळाकडून वाहतूक विभागाला आणि पोलिसांना पत्र दिले गेले आहे. तसेच त्या गाडयांचे नंबरही कळवले आहेत.अवैध प्रवासी वाहतूक रोखण्याचे काम एसटीचे नसून त्या स्पर्धेत आपण उतरलो आहोत. प्रवाशांची गरज असते त्या त्यावेळी जादा गाडया सोडल्या जातात. खासगी वाहतुक करणारे प्रवाशांची पिळवणूक करतात, दामदुप्पट घेतात, अपघाती विमा नसतेा, वाहन उपलब्ध होत नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्वाची असल्याचे कल्याण एसटी डेपो आगार प्रमुख विजय गायकवाड यांनी सांगितले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -