घरमुंबईलाखो रुपयांचा अवैध लाकूडसाठा जप्त!

लाखो रुपयांचा अवैध लाकूडसाठा जप्त!

Subscribe

शहापूर वन विभागाची धडक कारवाई

शहापूर उपवनसंरक्षकाच्या कार्यक्षेत्रातील खर्डी वनपरिक्षेत्रात वन विभागाच्या वनअधिकारी आणि वन कर्मचार्‍यांच्या धाड सत्रात लाकूड चोरट्या टोळ्यांनी अवैधरित्या दडवून ठेवलेला सागवान तसेच इंजायली हा लाखो रुपये किमतीचा मौल्यवान लाकूड साठा खैरपाडा परिसरातून जप्त करण्यात केला आहे.

वन विभागाच्या धाडीचा सुगावा लागताच या लाकूड तस्करी टोळीतील आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. धाडीत जवळपास ९ ट्रक लाकूडसाठा हस्तगत करण्यात आल्याचे शहापूर वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहापूर उपवनसंरक्षक व्ही. टी. घुले, सहाय्यक वनसंरक्षक वनी व वन्य एच. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख यांनी आपल्या वनकर्मचारी पथकासह ही यशस्वी कारवाई शनिवारी पार पाडली.

- Advertisement -

पकडलेला लाकूड साठा ३५ ते ४० घनमीटर असून या लाकडांची किंमत बाजारभावाप्रमाणे १६ लाखांच्या घरात असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात प्रथमच इतका मोठा चोरट्या लाकडाचा साठा सापडला आहे. यापूर्वी देखील पिवळी खोर परिसरात असाच लाकूडसाठा हस्तगत करण्यात आला होता. खर्डी परिसरातील या धाडसत्रात शहापूर, वाशाळा, धसई, डोळखांब तसेच विहीगाव या वनपरिक्षेत्राचे वन परिक्षेत्रअधिकारी, वनकर्मचारी, दक्षतापथक, लोकल चेंकीग वन कर्मचार्‍यांची मदत घेण्यात आली होती. दरम्यान, वन विभागाच्या या धाडसत्र कारवाईमुळे तालुक्यातील जंगल चोरट्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जप्त बैलगाडी पकडल्यामुळे लागला चारीचा सुगावा
दोन दिवसांपूर्वी टेंभा-अंबिवली येथील जगलातून बैलगाडीने अंदाजे ३० हजारांच्या चोरट्या लाकडाची वाहतूक होत असताना वनक्षेत्रपाल प्रशांत देशमुख यांनी पकडली होती. परंतु अंधाराचा फायदा घेऊन चोरटा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. याच आरोपीचा शोध घेण्यासाठी वनक्षेत्रपाल देशमुख पुन्हा खैरपाडा येथे गेले असता तपासणी करताना एका बेड्याघराजवळ सागाच्या कड्या आणि फळ्या पडलेल्या दिसल्याने तो माल जप्त केला गेला. दरम्यान, पूर्ण खर्डी विभागात आणखी धाडसत्र सुरू राहणार असल्याचे खर्डीचे वनक्षेत्रपाल प्रशांत देशमुख यांनी माहिती देताना सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -