Weather Alert: पुणे, सातारा, नाशिक भागात पावसाची शक्यता – IMD

राज्यातील विविध भागांत येत्या दोन ते तीन दिवसात मध्य महाराष्ट्रातील घाटभागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

IMD forecast two days of heavy rain in Pune, Satara and Nashik district
Weather Alert: पुणे, सातारा, नाशिक भागात पावसाची शक्यता - IMD

राज्यातील विविध भागात येत्या दोन ते तीन दिवसात मध्य महाराष्ट्रातील घाटभागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर याठिणी मेघगर्जनासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसात आलेल्या ‘तौक्ते चक्रीवादळा’मुळे महाराष्ट्रातील विविध शहरात पावसाने हजेरी लावली होती. जोरदार वाऱ्यासह अनेक भागात पाऊस झाला होता. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घरांची आणि झाडांची पडझडं होऊन मोठे नुकसान झाले होते. याचा सर्वात जास्त फटका हा महाराष्ट्र,गोवा आणि गुजरात या राज्यांना बसला होता. तर महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेकांचे नुकसान झाले. बऱ्याच जणांच्या घराचे पत्रे उडून गेले तर अनेकांच्या फळबागांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आता येत्या दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असून मध्य महाराष्ट्रातील भागात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 राज्यात कुठे होणार पाऊस

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने मेघगर्जनेसह आणि विजांचा कडकडाट, वेगवान वाऱ्याची आणि पावसाची शक्यता वर्तवली आहे. या अंदाजानुसार सातारा, पुणे, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. तसेच वातावरणात देखील बदल दिसत असून बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


हेही वाचा – तराफा दुर्घटनेतील मृतांची संख्या ४१ तर ३४ जण अद्याप बेपत्ता