घरमुंबईयंदा ४२ हजार गणेश मूर्तींचे विसर्जन; मुंबई महापालिकेची माहिती

यंदा ४२ हजार गणेश मूर्तींचे विसर्जन; मुंबई महापालिकेची माहिती

Subscribe

यंदा प्रथमच गणेशोत्सवाला धामधुमीचा साज नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार यावेळी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे काल, मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढोलताशे, मिरवणुकींच्या शिवाय बाप्पाला निरोप देण्यात. यावेळी मुंबईतील समुद्रात आज, बुधवारी सकाळपर्यंत एकूण २८ हजार २९३ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले असून कृत्रिम तलावात १३ हजार ७४२ मूर्तींचे विसर्जन झाले असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली.

मुंबईतील समुद्रात काल मध्यरात्रीपर्यंत ३ हजार ८१७ सार्वजनिक तर २४ हजार ४७६ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यता आले. तसेच कृत्रिम तलावात २ हजार ०५१ सार्वजनिक तर ११ हजार ६९१ घरगुती गणपतींचे विसर्जन झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबईमध्ये दरवर्षी गणपती मिरवणुकीची वेगळीच धूम असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूकीवर बंदी घालण्यात आली होती. मुंबईमध्ये अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने विशेष काळजी घेण्यात आली असून शहरात ३५ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच विसर्जन मिरवणुकीला बंदी घालण्यात आली होती. शहरात ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर होती. तसेच मुंबई महापालिकेने गर्दीचे विभाजन करण्यासाठी ४४५ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा –

कोरोनाची लस विकसित करण्यासाठी जगाला मदत करण्यास अमेरिकेचा नकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -