घरट्रेंडिंगMakar Sankranti 2022: संक्रांतीला पतंग उडवणार आहात ? अदाणी इलेक्ट्रिसिटीचा महत्वाचा...

Makar Sankranti 2022: संक्रांतीला पतंग उडवणार आहात ? अदाणी इलेक्ट्रिसिटीचा महत्वाचा अलर्ट

Subscribe

पतंग उडवण्याच्या उत्साह अनेकदा जिवावर देखील बेततो. पंतग उडवताना झालेले अपघात आपण पाहिले आहेत. त्यामुळेच पतंग उडवताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मकर संक्रांतीला पतंग उडवण्यासाठी प्रसिद्ध अशा अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबईने सर्व मुंबईकरांना लाखमोलाचा सल्ला दिला

मकर संक्रांतीच्या दिवशी घराच्या गच्चीत जाऊन पतंग उडवण्याची मजा काही औरच असते. पतंग उडवण्याचा मकर संक्रांती हा खास मुहूर्त असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पतंग उडवण्याचा आनंद घेताना दिसतात. अनेक ठिकाणी पतंग उडवण्याचा रितसर कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र पतंग उडवण्याच्या उत्साह अनेकदा जिवावर देखील बेततो. पंतग उडवताना झालेले अपघात आपण पाहिले आहेत. त्यामुळेच पतंग उडवताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मकर संक्रांतीला पतंग उडवण्यासाठी प्रसिद्ध अशा अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबईने सर्व मुंबईकरांना लाखमोलाचा सल्ला दिला आहे.

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने (एईएमएल) मकर संक्रांतीच्या आनंदोत्सवापूर्वी मुंबईकरांना उत्तम आरोग्य आणि आनंदाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याद्वारे पतंग उडवणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. त्यांनी ओव्हरहेड ऊर्जा पारेषण वाहिन्यांजवळ पतंग उडवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. हा सावधगिरीचा सल्ला सुरक्षित उत्सवाच्या भावनेने जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

पतंगाची तार किंवा मांजा, विजेची चांगली वाहक असते. यामुळे जर हा मांजा डोक्यावरील वीज वहन वाहिन्यांना स्पर्श झाल्यास किंवा वाहिन्यांच्या आकर्षण क्षेत्रात आला तरी तेव्हा त्याद्वारे भरपूर उच्च व्होल्टेज प्रसारित होऊ शकते, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

पारेषण वाहिन्यांजवळ असुरक्षित पतंग उडवल्याने कोणतीही अप्रिय घटना लक्षात आली किंवा कळली तर  एईएमएलच्या 19122 या पॉवर हेल्प लाईनवर त्वरित कळवावे, असे आवाहन एईएमएलने या भागातील ग्राहक आणि नागरिकांना करण्यात आले आहे. यामुळे कंपनीकडून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करता येईल. तसेच ग्राहक किंवा कंपनीच्या @Adani_Elec_Mum या सोशल मीडिया  हँडल तसेच वेबसाइट किंवा अदाणी इलेक्ट्रिसिटी अँपलादेखील भेट देऊ शकतात.

- Advertisement -

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड विषयी  

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड, हा अदाणी समूहाचा वैविध्यपूर्ण भाग असून ही ऊर्जा निर्मिती, पारेषण व किरकोळ वीज वितरण, अशा एकात्मिक उद्योगात कार्यरत आहे. एईएमएलची भारतातील सर्वात मोठ्या व सर्वाधिक प्रबळ वीज वितरण जाळ्यावर मालकी आहे. एईएमएल मुंबई व उपनगरातील 400 चौरस किमीवरील 30 लाख ग्राहकांना सेवा देते. त्याद्वारे 2000 मेगावॉट वीज मागणी 99.99 टक्के विश्वासार्हतेसह पूर्ण केली जाते. हा आकडादेखील देशात सर्वाधिक आहे. एईएमएल अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्वोत्तम ग्राहक काळजी सेवा देते. अधिक माहितीसाठी कृपया www.adanielectricity.com येथे भेट द्या.


हेही वाचा – ‘कोरोनावर मात करून आरोग्याचा गोडवा वाढवूया’ मुख्यमंत्र्यांकडून संक्रांतीच्या शुभेच्छा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -