घर मुंबई मुंबईतील इमारतींच्या पुनर्विकासासाठी देवेंद्र फडणवीसांची महत्त्वपूर्ण घोषणा

मुंबईतील इमारतींच्या पुनर्विकासासाठी देवेंद्र फडणवीसांची महत्त्वपूर्ण घोषणा

Subscribe

मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांची एकदिवसीय परिषद मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाच्या घोषणा करत मुंबईतील पुनर्विकास करण्यात येणाऱ्या इमारतींबाबत निर्णय घेतले आहेत.

मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांची एकदिवसीय परिषद मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. भाजप विधान परिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता. १४) ही दोन दिवसीय परिषद होणार आहे. या परिषदेचे उद्‍घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाच्या घोषणा करत मुंबईतील पुनर्विकास करण्यात येणाऱ्या इमारतींबाबत निर्णय घेतले आहेत. (important announcement by Devendra Fadnavis for redevelopment of buildings in Mumbai) दोन आठवड्यांपूर्वीच या परिषदेची घोषणा करण्यात आलेली होती.

हेही वाचा – नितेश राणेंचे संजय राऊतांना आव्हान; म्हणाले, “पोलीस संरक्षण बाजूला ठेवा…”

- Advertisement -

या परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करत सांगितले की, मुंबईतील गृहनिर्माणासंदर्भातील प्रश्न हे ज्वलंत आहेत. अनेक प्रश्न हे 20 वर्षांपासून प्रलंबित आहेत. ज्या प्रभावीपणे या प्रश्नांवर उपाय निघाला पाहिजे, 40-50 वर्षांपूर्वीच्या पुनर्विकासाचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. जो पर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत पंतप्रधानांच्या मनातील Ease of Leaving म्हणजेच सामान्य माणसाला जगण्यासाठी सवलत मिळावी, अशा प्रकारचा जो विषय आहे. तो मुंबईमध्ये होऊ शकणार नाही. म्हणूनच सातत्याने जो सामान्य मुंबईकर आहे. याच्या जीवनामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर पुनर्विकासाच्या क्षेत्रात बदल करण्याची गरज आहे, असे फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील इमारतींच्या पुनर्विकासाच्याबाबत निर्णय देत माहिती दिली की, यापुढे इमारतींच्या संदर्भातील स्वयं पुनर्विकासासाठी एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाची हाल थांबविण्यासाठी या एका खिडकीच्या अंतर्गतच तीन महिन्यात काम पूर्ण करण्याची जबाबदारी विभागाची असेल, अशी माहिती देण्यात आली. तर यासाठी एका स्पेशल सेलची निर्मिती करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत या विभागाशी समन्वय साधून या सेलने तीन महिन्याच्या आत काम पूर्णत्वास न्यावे. तर या सर्व कामाच्या मध्ये लाल फित आडवी येणार नाही, याबाबतची काळजी घेण्यात येणार असल्याचे देखील यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -