घरमुंबईपवई आयआयटीतील दर्शन सोलंकी आत्महत्येप्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे

पवई आयआयटीतील दर्शन सोलंकी आत्महत्येप्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे

Subscribe

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पवई आयआयटी येथे पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांना महत्वाची माहिती हाती लागल्याचे समोर आले आहे.

पवई आयआयटीमध्ये पहिल्या बी.टेकच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. पवई आयआयटीच्या वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून दर्शन सोलंकी याने आपल्या जीवनाचा शेवट केला. ज्यानंतर या घटनेमुळे पवई आयआयटीच्या परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेचा अधिकचा तपास हा एसआयटीकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाची महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

दर्शन सोलंकी याने सहामाही परिक्षा संपल्यानंतर हे टोकाचे पाऊल उचलल्याने त्याने अभ्यासाच्या तणावातून हे पाऊल उचलल्याचे बोलले जात होते. पण आता दर्शन सोलंकी याची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्यामुळे या प्रकरणी आता पोलिसांकडून वेगाने तपास केला जात आहे. तसेच दर्शनला धमकी दिल्याचे आणि जातीवाचक टिपण्णी केल्याचे सुद्धा पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. ज्यामुळे आता पोलीस दर्शन आणि एका विद्यार्थ्याच्यामधील व्हॉट्सअप चॅट तपासत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, अहमदाबाद येथे राहणारा दर्शन सोलंकी हा बी.टेक मेकॅनिकलचे शिक्षण घेत होता. पहिल्या वर्षाची सहामाही परिक्षा संपल्यानंतर लगेच त्याने आत्महत्या केली. पोलिसांना या हत्येची कोणतीही माहिती हाती न लागल्याने दर्शनने आत्महत्या का केली? हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. पण या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्यसभेचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केली होती. त्यानुसार याप्रकरणाची एसआयटीकडून चौकशी करण्यात येत आहे.

दर्शन सोलंकी याने आत्महत्या केल्यानंतर पवई आयआयटीच्या कॅम्पसबाहेर अनेक संघटनांच्या विद्यार्थ्यांनी जमून आंदोलन केले होते. यामध्ये शेकडो आंदोलनकर्ते सहभागी झालेले होते. या आंदोलनामध्ये महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन, डीवायएफआय, आरपीआय, भीम आर्मी, सीआयटीयू, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, जाती अंत संघर्ष समिती, जनवादी महिला संघटना, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन आणि रोहिदास समाज संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीमुळे तणाव देखील निर्माण झाला होता. या घटनेनंतर दर्शनने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली असल्याचा दावा त्याच्या बहिणीकडून करण्यात आला होता. त्यामुळे आता पोलिसांच्या हाती लागलेल्या सुसाईड नोटमुळे या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – केंद्र सरकारचा मोठा धक्का, खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी बेघर होणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -