घरCORONA UPDATEकोरोनाचा सामना करण्यासाठी ११५ दिवसांत ११२ कोटींचे दान

कोरोनाचा सामना करण्यासाठी ११५ दिवसांत ११२ कोटींचे दान

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ११५ दिवसांत विविध कंपन्यांकडून राज्य सरकारच्या हाफकिन महामंडळाला तब्बल १११ कोटी ८० लाख किमतीची वैद्यकीय साधनांची मदत करण्यात आली आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यभरातून विविध सामाजिक संस्था, कंपन्या आणि दानशूर व्यक्ती मुख्यमंत्री सहायता निधीला सढळ हस्ते मदत करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ११५ दिवसांत विविध कंपन्यांकडून राज्य सरकारच्या हाफकिन महामंडळाला तब्बल १११ कोटी ८० लाख किमतीची वैद्यकीय साधनांची मदत करण्यात आली आहे. वैद्यकीय साहित्यांमध्ये पीपीई किटची संख्या १ लाख ९० हजार, एन ९५ मास्कची संख्या ४ लाख ७५ हजार तर मेडिकल प्रोटेक्टिव्ह मास्क २३ लाख ३० हजार इतकी आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठीराज्य सरकारने अनेक कंपन्यांनात्यांच्या सीएसआर निधीतून आवश्यक वैद्यकीय उपकरणे देण्याचे आवाहन केले होते. त्याला अनेक कंपन्या, सामाजिक संस्था, संघटना यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मदतीचा हातही पुढे केला. २४ मार्चपासून राज्य सरकारकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. १४ जुलैपर्यंत ४३५ ट्रक भरून वैद्यकीय साहित्य आले असून, ते तब्बल १११ कोटी ८० लाख रुपये किमतीचे आहे. यामध्ये मेडिकल प्रोटेक्टिव्ह मास्कची संख्या २३ लाख ३० हजार ७४०, एन ९५ मास्कची संख्या ४ लाख ७५ हजार ४८९, पीपीई किटची संख्या १ लाख ९० हजार, हॅण्ड सॅनिटायझर ४ लाख ६० हजार ३१८, डेटॉल सोप ३ लाख, फेस शिल्ड ७६ हजार २५०, हॅण्ड ग्लोव्हजची संख्या १ लाख ५२ हजार १००इतकी आहे. हाफकिनमध्ये मोठ्या प्रमाणात येत असलेली वैद्यकीय उपकरणे उतरवण्यासाठी हाफकिनचे ११० कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. हाफकिनच्या ११ गोडाऊनमध्ये साठा करून ते राज्यातील विविध जिल्ह्यांना पाठवण्यात येत आहे. दिवसरात्र काम करणारे हाफकिनचे कर्मचारीही एकप्रकारे कोरोना योद्धा ठरत आहेत.

- Advertisement -

या कंपन्यांनी केली मदत

एल अँड टी इंडस्ट्रीज लिमिटेड, हिकल लिमिटेड, अमेरिकेअर फाउंडेशन, हुंदाई मोटर्स, सिमेन्स लिमिटेड, विप्रो लिमिटेड, रिलायन्स जिओ, टेक महिंद्रा, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा लिमिटेड, गोदरेज इंडस्ट्रीज, मीर फाऊंडेशन, रोटरी क्लब, डेटॉल कंपनी, हिंदुस्थान युनिलिवर, एचडीएफसी लिमिटेड, पिरामल स्वास्थ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, मेथीबाई देवराज गुंडेचा फाऊंडेशन, स्पार्टा टेक्नोलॉजी प्रा.लि. या सारख्या अनेक कंपन्यानी आपल्या सीएसआर निधीतून मोठ्या प्रमाणात आवश्यक साधने व उपकरणे राज्य सरकारला उपलब्ध करून दिली आहेत.

कोरोनाविरोधात लढण्यासाठी विविध संस्था, कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपकरणांची मदत राज्य सरकारला येत आहे. हाफकीनमध्ये येणारे मदतीचे ट्रक खाली करणे, सामानांची नोंद करणे व ते पुन्हा जिल्हानिहाय पाठवण्याचे काम कर्मचारी रात्रंदिवस करत आहेत. हाफकिनचे कर्मचारी २४ तास मेहनत घेत आहेत.
– डॉ. राजेश देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ
- Advertisement -

सी.एस.आरच्या माध्यमातून मिळालेले साहित्य

    साहित्याचे नाव                              संख्या

  • एन ९५ फेस मास्क                        ४,७५,४८९
  • मेडिकल प्रोटेक्टिव्ह मास्क,
    एफ.एफ.पी २,३ फेसमास्क              २३,३०,४७०
  • पीपीई किट आणि प्रोटेक्टिव्ह क्लोथ      १,९०,००८
  • हॅण्ड ग्लोव्हज                              १,५२,१००
  • हॅण्ड सॅनिटायझर                          ४,६०,३१८
  • डेटॉल सोप                                ३,००,०००
  • सरफेस अ‍ॅण्ड एरियल डिसइन्फेक्टंट    १,७८,८००
  • लाईफबॉय सोप अ‍ॅण्ड हॅण्ड वॉश         ८७,४६८
  • फेस शिल्ड                               ७६,२५०
  • व्हेंटिलेटर                                      १८९
  • प्रोटेक्टिव्ह अ‍ॅण्ड सेफ्टी गॉगल            ३४,२८०
  • अस्थमा इन्हेलर                            १०,०००
  • सर्जिकल कॅप्स                             २,२५०
Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -