घरमुंबईसहा वर्षात मुंबईत ४४८ जणांचं अवयवदान

सहा वर्षात मुंबईत ४४८ जणांचं अवयवदान

Subscribe

मुंबईच्या झेडटीसीसी म्हणजेच विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा वर्षात मुंबईत ४४८ दात्यांनी अवयवदान केले आहेत.

अवयवदानातून आठ जणांना जीवदान मिळते हे सर्वश्रूत असले तरी आजही दुसऱ्या राज्यांच्या तुलनेत अवयवदान तेवढ्या प्रमाणात होत नाही. मुंबईच्या झेडटीसीसी म्हणजेच विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा वर्षात मुंबईत ४४८ दात्यांनी अवयवदान केले आहेत. तर, रोटो आणि सोटो या संस्थांच्या आकडेवारीनुसार राज्यात या नवीन वर्षातील पहिल्या दोन महिन्यांत ३८ अवयवदान झाले आहेत. यात मुंबईतून २२, पुण्यातून १३ आणि नागपूरमधून ३ जणांनी अवयवदान केले आहे.


हेही वाचा – दोघांच्या अवयवदानामुळे आठ जणांना जीवदान

- Advertisement -

किडनी दानाची गरज जास्त

सहा वर्षाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४४८ जणांचे अवयवदान करण्यात आले आहेत. त्यात ७३४ किडनी दान करण्यात आली आहे. ३१३ यकृत, ११ फुप्फुस आणि ११३ हृदय दान करण्यात आले आहे. आकडेवारीच्या अंदाजानुसार, किडनीची गरज ही इतर अवयवांच्या तुलनेत जास्त आहे.

याविषयी विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. एस. के .माथूर यांनी सांगितलं की, ” गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत २०१९ या वर्षातील पहिल्या दोन महिन्यात मुंबईत २२ अवयव प्रत्यारोपण झाली आहेत. त्यामुळे, अवयवदान चळवळीमुळे तसेच जागरुकतेमुळे अवयवदानाची संख्या वाढत आहे. ही चळवळ अशीच सुरू ठेवण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे. “

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -