घरताज्या घडामोडीभिवंडीतील कोरोना संसर्गाची साखळी तोडणार, आयुक्तांची घोषणा

भिवंडीतील कोरोना संसर्गाची साखळी तोडणार, आयुक्तांची घोषणा

Subscribe

मालेगाव येथे कोरोना विरोधात प्रभावी काम करून तेथील रुग्ण आटोक्यात आणण्यात यशस्वी झालेले डॉ. पंकज आशिया यांची भिवंडी महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती केली.

अनलॉक कालावधीत भिवंडी शहरातील रुग्ण वाढीचा वेग दिवसेंदिवस वाढत असून मृत्यूच्या संख्येत सुध्दा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरवासियांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, शासनाने भिवंडी येथील परिस्थिती हाताळण्यासाठी महानगरपालिका आयुक्त म्हणून मालेगाव येथे कोरोना विरोधात प्रभावी काम करून तेथील रुग्ण आटोक्यात आणण्यात यशस्वी झालेले डॉ. पंकज आशिया यांची भिवंडी महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती केली.

दरम्यान, तब्बल तीन दिवस कामकाजाचे प्रशासनाकडून राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चार कलमी उपाययोजनांची घोषणा करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करुन येत्या १० दिवसात येथील परिस्थितीत आमूलार्ग बदल घडवून आणण्याचा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी उपायुक्त नूतन खाडे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले आदी उपस्थित होते.

- Advertisement -

शहरात कोरोना दुपट्टीचा वेग कमी असून त्यासाठी सर्वप्रथम रुग्णालय व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून एकमात्र आयजीएम रुग्णालयावर अधिक भर असल्याने शहरातील जे रुग्णालय अधिग्रहित केले आहेत. त्याशिवाय इतर रुग्णालय व्यवस्थापना सोबत चर्चा करून अधिक बेड कसे उपलब्ध होतील हे पाहत असतानाच, जे रुग्ण आढळून येत आहेत त्यांच्या अतिनिकट संपर्कात आणि जवळील व्यक्तींची वेळीच तपासणी करणे त्यांना क्वॉरंटाईन करणे यावर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी रुग्णांनाही आपला आजार लपवून न ठेवता त्याची वेळीच माहिती दिल्यास उपचार करणे सहज शक्य असून त्यासाठी शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी शहरातील मशिदीचे मौलवी मौलाना यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांची मदत जनजागृतीसाठी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

यासोबत समोर येणाऱ्या रुग्णांची तपासणी होणे ही गरजेचे असून त्यासाठी तपासणीच्या संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच दररोज १५० तपासणी करण्याचा मनोदय असून शहरातील कंटेनमेंट क्षेत्रातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांचे पथक करून त्यावर लक्ष केंद्रित करून कामास लवकरच सुरवात होणार असल्याने या उपाय योजनांची योग्य अंमलबजावणी महानगरपालिका कर्मचारी, नागरिक, शहरातील स्वयंसेवी संस्था या सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून त्या माध्यमातून येत्या दहा दिवसांत येथील परिस्थिती नक्कीच आटोक्यात आणण्यात यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

- Advertisement -

कोरोना विरोधातील या लढ्यात प्रशासन आणि नागरीक यांच्यातील विश्वासाचे नाते गरजेचे असून शहरात आरोग्य सेवेतील कर्मचारी कमी असताना ते काम करीत आहेत. त्यांच्या सोबतीने अधिक डॉक्टर्स उपलब्ध व्हावेत यासाठी आमचा प्रयत्न असून त्यासाठी शहरातील विविध डॉक्टर्स संघटना प्रतिनिधीं सोबत बैठक सुरु असून शहरातील निर्जंतुकीकरण करणे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात इतर रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी सर्वांना सूचना देण्यात आल्या असून या लढ्यात सर्वांच्या साथीने मुकाबला करता येणे शक्य असल्याचा विश्वास आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी शेवटी व्यक्त केला.


हेही वाचा – महावितरणच्या ग्राहकांना सुलभ हप्त्यांमध्ये वीजबिल भरण्याची सवलत


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -